अन्याय करणाऱ्या सपाच्या मांडीवर काँग्रेस - मोदींची टीका
By admin | Published: February 12, 2017 02:10 PM2017-02-12T14:10:35+5:302017-02-12T14:10:35+5:30
मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीसोबत केलेल्या आघाडीवरून पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केले आहे. राजकीय स्वार्थापायी काँग्रेज आज अन्यायी समाजवादी पक्षाच्या
Next
ऑनलाइन लोकमत
देहराडून, दि, 12 - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या रेनकोट टिप्पणीवरून सुरू झालेला वाद अद्यापही थांबलेला नाही. मात्र मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीसोबत केलेल्या आघाडीवरून पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केले आहे. राजकीय स्वार्थापायी काँग्रेज आज अन्यायी समाजवादी पक्षाच्या मांडीवर जाऊन बसली आहे, अशा शेलक्या शब्दात आज उत्तराखंडमधील श्रीनगर येथे प्रचारसभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
मोदी म्हणाले, उत्तराखंड आंदोलनावेळी समाजवादी पक्षाच्या लोकांनी आंदोलकांवर अन्याय अत्याचार केले होते. त्याच समाजवादी पक्षाच्या मांडीवर आज काँग्रेस जाऊन बसली आहे. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यावरही मोदींनी हल्लाबोल केला. ज्या व्यक्तीला राज्याविषयी आपलेपणा वाटत नाही तो राज्याचे काय भले करणार? असा सवाल मोदींनी केला. तसेच उत्तराखंडच्या विकासासाठी काँग्रेसला राज्यातून हटवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी भ्रष्टाचार, नोटबंदी, वन रँक वन पेन्शन आणि सर्जिकल स्ट्राइकवरूनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. "काँग्रेसने सर्जिकल स्ट्रइकचे पुरावे मागितले होते, हा सैनिकांचा अवमान होता. आता काळ बदलला आ्हे. दिल्लीतील सरकारही बदलले आहे. आता माझ्या देशाचा जवान वार झेलणार नाही तो पलटवार करेल," असे मोदी म्हणाले.
Uttarakhand mein bhi Samajwadi Party aur Congress, parde ke peeche aapke sath khel khel rahe hain: PM Modi in Srinagar, Uttarakhand pic.twitter.com/hg6LSSwsD4
— ANI (@ANI_news) February 12, 2017
Waqt badal chuka hai, Delhi mein sarkar badal chuki hai. Mere desh ka fauji ab waar nahi sahega, wo pratiwaar karega: PM Modi pic.twitter.com/0OqlCATGoT
— ANI (@ANI_news) February 12, 2017