शेतकऱ्याने स्मृती इराणींवर फेकल्या बांगड्या, मंत्री म्हणाल्या हा काँग्रेसचा डावपेच

By admin | Published: June 13, 2017 11:08 AM2017-06-13T11:08:57+5:302017-06-13T11:08:57+5:30

महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमधील शेतकरी अंदोलनाचा वनवा आता गुजरातमध्ये पसरल्याचे दिसतं आहे. काल केंद्रिय मंत्री स्मृती इराणी एका कार्यक्रमासाठी गुजरातला गेल्या असता

The Congressman said that the farmer had bangles thrown on Smriti Irani, the minister said the Congress tactics | शेतकऱ्याने स्मृती इराणींवर फेकल्या बांगड्या, मंत्री म्हणाल्या हा काँग्रेसचा डावपेच

शेतकऱ्याने स्मृती इराणींवर फेकल्या बांगड्या, मंत्री म्हणाल्या हा काँग्रेसचा डावपेच

Next

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 13 - महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमधील शेतकरी अंदोलनाचा वनवा आता गुजरातमध्ये पसरल्याचे दिसतं आहे. काल केंद्रिय मंत्री स्मृती इराणी एका कार्यक्रमासाठी गुजरातला गेल्या असता त्यांच्या दिशेनं एका शेतकऱ्याने बांगड्या फेकल्याची घटना घडली आहे. गुजरातमधील अमरेली येथे स्मृती इराणी यांची काल जाहीर सभा होती. त्या व्यसपीठावर भाषण करत असताना एका शेतकऱ्याने त्यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या. केतन कासवाल असे त्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासवाल याला घेऊन जात असताना स्मृती इराणी यांनी त्याला सोडून द्यायची विनंती केली होती. त्याला बांगड्या फेकू देत. मी याच बांगड्या त्याच्या बायकोला भेट देईन, असे इराणी यांनी म्हटले. गुजरात मध्ये निवडणुकीचे वारे वाहत असून आशा घटना घडू शकतात याचा मला अंदाज यापूर्वीच होता. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, एका महिलेवर आक्रमण करण्यासाठी त्यांनी पुराषाला पाठवलं आहे. काँग्रेसची ही रणनीती चुकीची आहे.
या घटनेविषयी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, केतन कासवाल शेतकरी असून त्याने कर्जमाफीच्या मागणीसाठी बांगड्या फेकून सरकारचा निषेध केला. कासवालचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. बांगड्या फेकताना तो केवळ वंदे मातरमच्या घोषणा देत होता.
मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्मृती इराणी बोलत होत्या. यावेळी केतन कासवाल हा व्यासपीठापासून बऱ्याच दूर अंतरावर बसला होता. इराणी यांनी भाषणाला सुरूवात केल्यानंतर केतन अचानकपणे उठला. यावेळी त्याने इराणी यांच्या दिशेने दोन ते तीन बांगड्या फेकल्या. मात्र, केतन व्यासपीठापासून दूर असल्याने त्या इराणी यांच्यापर्यंत पोहचू शकल्या नाहीत.

आणखी वाचा -   स्मृती इराणी यांना मोदी यांचा आणखी एक हादरा

कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम हैं कहना - स्मृती इराणी

 

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर, भाजपसाठी "अच्छे दिन" - स्मृती इराणी

 

 

 

Web Title: The Congressman said that the farmer had bangles thrown on Smriti Irani, the minister said the Congress tactics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.