खट्टर सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 06:26 AM2021-03-10T06:26:46+5:302021-03-10T06:26:53+5:30
हरयाणात आज अविश्वास प्रस्तावावर मतदान : संख्याबळ मात्र अपुरे
शीलेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नव्या तीन कृषी कायद्यांवरून काँग्रेसने हरयाणात भाजपच्या नेतृत्वाखालील खट्टर सरकारला अविश्वास प्रस्तावावरील मतदानातून पाडण्याचा प्रयत्न चालवला असला तरी, त्याच्याकडे तेवढे संख्याबळ नाही. आता सगळी भिस्त खट्टर सरकारमध्ये सहभागी असलेला दुष्यंत चौटाला यांचा पक्ष जेजेपीवर आहे, की हा पक्ष आंदोलक शेतकऱ्यांच्या किती दबाबाखाली येतो.
९० जागांच्या विधानसभेत खट्टर सरकारला ५५ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात भाजप ३०, जेजेपी १०, अपक्ष ५ असे संख्याबळ आहे. काँग्रेस आणि विरोधकांना ३५ आमदारांचा पाठिंबा होता. काँग्रेसच्या एका आमदाराचे सदस्यत्व संपवून सभागृहाबाहेर काढण्यात आले आहे. भाजपला पाठिंबा देत असलेल्या एका आमदाराने शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. संपूर्ण काँग्रेस शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी जेजेपीवर दडपण वाढवत आहे, की मतदानाच्या आधी त्याने खट्टर सरकारचा पाठिंबा मागे घ्यावा किंवा सभागृहात सरकारच्याविरोधात मतदान करावे.
सीबीआय, ईडी, आयकरसारख्या यंत्रणांची भीती
n पक्षाने व्हीप जारी करून बुधवारी ‘अविश्वास प्रस्तावा’ला विरोध करण्यास सांगितले आहे. मत घेतले आणि विश्वासघात केला आणि सत्तेसाठी शेतकऱ्यांचे हित विकून टाकले.” या ट्वीटचे लक्ष्य जेपीपीच्या नेतृत्वावर नाराज असलेले परंतु, शेतकऱ्यांना पाठिंबा असलेले आमदार आहेत.
n सुरजेवाला यांनी आरोप केला की, “खट्टर सरकारला वाचवण्यासाठी भाजप, सीबीआय, ईडी, आयकरसारख्या यंत्रणांची भीती जेजेपीला दाखवू शकतो. कारण दुष्यंत यांचे वडील ओमप्रकाश चौताला तुरुंगात आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी दुष्यंत चौताला खट्टर सरकारला पाठिंबा देण्यासाठी तयार झाले होते.”