खडसेंविरोधात कॉँग्रेसची निदर्शने
By Admin | Published: June 3, 2016 11:19 PM2016-06-03T23:19:30+5:302016-06-03T23:19:30+5:30
जळगाव - महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर झालेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहर जिल्हा कॉँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.
ज गाव - महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर झालेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहर जिल्हा कॉँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. भाजपात पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा, गिरीश बापट यांचा डाळ घोटाळा, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरील आरोप, चंद्रशेख बावनकुळे यांनी खाजगी कंपनीला नियमबा पद्धतीने ५७२ कोटी रुपयांची वीज शुल्क माफी दिल्याचा आरोप, विनोद तावडे यांची बोगस डीग्री व अन्य आरोप यासह वेगवेळ्या मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत. खडसे यांना दाऊदच्या घरातून आलेले फोन कॉल्स, जमीन खरेदी, जावयाची कार यासह विविध आरोप झाले आहेत. त्यांनी या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा द्यावा अशी मागणी कॉँग्रेसतर्फे करण्यात आली. या संदर्भातील निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. ए.जी.भंगाळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष पाटील, प्रदेश सचिव डी.जी. पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.