काँग्रेस सर्वात भ्रष्ट पक्ष, भाजपचा पलटवार

By admin | Published: December 27, 2016 07:47 PM2016-12-27T19:47:20+5:302016-12-27T19:47:20+5:30

संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मोदींकडे राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास भाजपाने सुरुवात केली आहे

Congress's most corrupt party, BJP's alliance | काँग्रेस सर्वात भ्रष्ट पक्ष, भाजपचा पलटवार

काँग्रेस सर्वात भ्रष्ट पक्ष, भाजपचा पलटवार

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - आज आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत  विरोधकांनी नोटाबंदी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मोदींविरोधात आरोपांची राळ उडवली. त्यानंतर विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास भाजपाने सुरुवात केली असून, काँग्रेस हा भ्रष्टाचाराला ओसरी देणारा सर्वात मोठा भ्रष्ट पक्ष असून, मोदींकडे उत्तर मागणारे राहुल गांधी 2जी आणि कोळसा घोटाळ्यावेळी गप्प का होते, असा सवाल भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. 
प्रसाद म्हणाले, "नोटाबंदीचा निर्णय हा देशाल ईमानदारीच्या रस्त्यावर आणण्यासाठी घेतला गेला आहे. दहशतवाद, नक्षलवाद यांना आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे. मग नोटाबंदीवरून मोदींकडे राजीनाम्याची मागणी का  होत आहे."
यावेळी प्रसाद यांनी राहुल गांधीच्या टीकेचाही समाचार घेतला, "राहुलजी मोदींना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचे आव्हान देत आहेत, पण 2जी, कोळसा घोटाळ्याबाबत राहुल गांधी काय बोलणार? बिनबुडाचे आरोप करणे योग्य नाही. राहुल गांधींमध्ये परिपक्वतेचा अभाव असल्याचे दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्ट होत आहे," असे ते म्हणाले. तसेच नोटाबंदीवरून विरोधी पक्षांच्या झालेल्या एकजुटीचा फुगा आज फुटला, असा टोलाही त्यांनी लगावला. 

Web Title: Congress's most corrupt party, BJP's alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.