मोदी सरकारविरुद्ध आजपासून काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

By admin | Published: December 30, 2016 02:27 AM2016-12-30T02:27:24+5:302016-12-30T02:27:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या नोटाबंदीच्या प्रचाराला तोंड देण्यासाठी काँग्रेसने मैदानात पाऊल टाकले आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार

Congress's nationwide movement against Modi government today | मोदी सरकारविरुद्ध आजपासून काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

मोदी सरकारविरुद्ध आजपासून काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

Next

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या नोटाबंदीच्या प्रचाराला तोंड देण्यासाठी काँग्रेसने मैदानात पाऊल टाकले आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य माणसाला झालेल्या त्रासाचा मुद्दा घेऊन काँग्रेस भाजपवर हल्ला करील.
काँग्रेस ३० डिसेंबरपासून आंदोलन सुरू करणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात राज्यांत पक्षाचे २०० वरिष्ठ नेते पत्रपरिषदा घेतील. लोकांना होत असलेला त्रास आणि गेल्या अडीच वर्षांत मोदी यांनी केव्हा-केव्हा व काय- काय खोटे सांगितले असेल, याची त्यात माहिती देतील.
पाच जानेवारी रोजी काँग्रेस कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालील. ८ जानेवारी रोजी देशभर महिलांना मैदानात उतरविण्याचे काँग्रेसचे नियोजन आहे. त्या दिवशी महिला काँग्रेस, जिल्हा काँग्रेस समिती, युवक काँग्रेस, एनएसयुआयचे कार्यकर्ते थाळीनाद आंदोलन करतील.
काँग्रेसने पक्षाच्या सगळ््या नेत्यांना मैदानात उतरविले आहे. त्यांचे काम असेल ते हे की त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना हे सांगायचे आहे की काळ््या पैशांच्या विरोधात काँग्रेस आहे परंतु नोटाबंदीचा निर्णय हा काळ््यापैशाच्याविरोधात नाही तर गरीबांच्या विरोधात होता, म्हणूनच काँग्रेस त्याच्याविरोधात उभी आहे.
पक्षाच्या या मोहिमेसाठी नऊ सदस्यांची प्रचार मोहीम समिती स्थापन करण्यात आली आहे. सरचिटणीस, सचिव आणि प्रदेश अध्यक्षांना या मोहिमेचे समन्वय करण्याची जबाबदारी देण्यात
आली आहे.

Web Title: Congress's nationwide movement against Modi government today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.