काँग्रेसचे विश्वेश्वर रेड्डी सर्वांत श्रीमंत उमेदवार, तेलंगणातून भरला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 05:31 AM2019-03-24T05:31:58+5:302019-03-24T05:35:04+5:30
काँग्रेसने तेलंगणातील चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांची कौटुंबिक संपत्ती ८९५ कोटी रुपये इतकी आहे.
हैदराबाद : काँग्रेसने तेलंगणातील चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांची कौटुंबिक संपत्ती ८९५ कोटी रुपये इतकी आहे.
अनेक पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर व्हायची आहे. ती आल्यानंतर रेड्डी यांच्यापेक्षा आणखी कोणी श्रीमंत आहे का, हे स्पष्ट होईल. रेड्डी यांची जंगम मालमत्ता २२३ कोटी रुपयांची आहे. त्यांच्या पत्नी के. संगीता रेड्डी या अपोलो हॉस्पिटलच्या सहव्यवस्थापकीय संचालक असून, त्यांची जंगम मालमत्ता ६१३ कोटी रुपयांची आहे. त्यांच्या दोन मुलांची जंगम मालमत्ता २0 कोटींची आहे. विश्वेश्वर रेड्डी व त्यांच्या पत्नी यांच्या नावाने स्थावर मालमत्ता अनुक्रमे २६ कोटी व १ कोटी ८१ लाख रुपयांची आहे. आंध्रातील मंत्री पी. नारायण हे नारायण ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सचे मालक असून, त्यांची कौटुंबिक मालमत्ता ६६७ कोटींची आहे. त्यांनी नेल्लोरमधून विधानसभेसाठी काल अर्ज भरला. (वृत्तसंस्था)
चंद्राबाबू ५७४ कोटींचे मालक : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांची कौटुंबिक मालमत्ता ५७४ कोटी रुपयांची आहे, तर त्यांचे विरोधक व वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची कौटुंबिक मालमत्ता सुमारे ५00 कोटी रुपयांची आहे.