काँग्रेसवाले म्हणाले, मीडियाने आंदोलन पेटविले !
By admin | Published: May 7, 2014 08:51 PM2014-05-07T20:51:57+5:302014-05-07T20:51:57+5:30
सोलापूर: शहरातील पाणीप्रश्नावर आयुक्तांनी बोलण्याऐवजी पदभार सोडणे चुकीचे आहे, काय झाले होते की गुडेवारांनी राजीनामा दिला़ त्यांना त्यांच्या जबाबदारीतून असे जाता येत नाही़ मात्र केवळ मीडियाने हे आंदोलन पेटविले असे मत सभागृहनेते महेश कोठे यांनी व्यक्त केले़ आमच्या ज्या नगरसेवकांनी पाण्यासाठी आंदोलन केले त्यांच्या प्रभागात आता सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे़ आम्ही आंदोलन केले म्हणूनच पाणीपुरवठा होऊ लागला असेही ते म्हणाले़ आयुक्तांनी अतिक्रमणे काढली, एलबीटी वसूल केला तरी आम्ही विरोध केला नाही़ आम्ही त्यांना कधीही राजीनामा द्या असे म्हटले नाही, त्यांच्या चांगल्या कामासाठी आम्ही सहकार्य करु, असेही कोठे-बेरिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले़
Next
स लापूर: शहरातील पाणीप्रश्नावर आयुक्तांनी बोलण्याऐवजी पदभार सोडणे चुकीचे आहे, काय झाले होते की गुडेवारांनी राजीनामा दिला़ त्यांना त्यांच्या जबाबदारीतून असे जाता येत नाही़ मात्र केवळ मीडियाने हे आंदोलन पेटविले असे मत सभागृहनेते महेश कोठे यांनी व्यक्त केले़ आमच्या ज्या नगरसेवकांनी पाण्यासाठी आंदोलन केले त्यांच्या प्रभागात आता सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे़ आम्ही आंदोलन केले म्हणूनच पाणीपुरवठा होऊ लागला असेही ते म्हणाले़ आयुक्तांनी अतिक्रमणे काढली, एलबीटी वसूल केला तरी आम्ही विरोध केला नाही़ आम्ही त्यांना कधीही राजीनामा द्या असे म्हटले नाही, त्यांच्या चांगल्या कामासाठी आम्ही सहकार्य करु, असेही कोठे-बेरिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले़ चौकट़़़फटाके फोडले़़़मनपा आयुक्त गुडेवार यांनी गुरुवारी सोलापुरात येऊन मनपाचा पदभार घेणार असल्याचे जाहीर करताच काही भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ महापालिकेत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी फटाके फोडून लाडू वाटले तर दत्त चौकात देखील विजय पुकाळेंसह कार्यकर्त्यांनी फटाके फोडून निर्णयाचे स्वागत केले़ दुपारनंतर व्यापार्यांनी दुकाने उघडावीत असेही आवाहन केले़