सीमेपलीकडच्या कारवाईचा विचार करा - भारतीय लष्कर

By admin | Published: September 19, 2016 09:22 AM2016-09-19T09:22:48+5:302016-09-19T13:36:16+5:30

वारंवार दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे.

Consider the Boundary Action - Indian Army | सीमेपलीकडच्या कारवाईचा विचार करा - भारतीय लष्कर

सीमेपलीकडच्या कारवाईचा विचार करा - भारतीय लष्कर

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - वारंवार दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सरकारने सीमेपलीकडच्या कारवाईचा विचार केला पाहिजे असे भारतीय लष्कराचे मत आहे. 
 
थेट युद्ध नाही पण पाकिस्तानला जरब बसेल अशी मर्यादीत स्वरुपाची कारवाई करावी असे भारतीय लष्करातील काही अधिका-यांचे मत आहे. सीमेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये  चालणा-या दहशतवादी तळांवर कारवाईचा करण्यासंबंधी सरकारने निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरुन पाकिस्तानला जरब बसेल असे अधिका-यांचे मत आहे. 
(VIDEO : उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन जवान शहीद)
(भारताच्या बलुचिस्तानच्या भूमिकेमुळे पाकिस्तानचा दहशतवादी हल्ला?)
(हल्लेखोरांकडे पाकची शस्त्रास्त्रे)
 
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे असे भारतीय लष्कराचे मत आहे. पाकिस्तानचा दारुगोळा भांडार तसेच त्यांच्या चौक्यांना यापूर्वी लक्ष्य केले आहे. त्याच रणनितीचा पुन्हा वापर करता येऊ शकतो. पाकिस्तानकडूनही उत्तर मिळेल पण आपण त्याचा सामना करण्यास समर्थ आहोत असे लष्करातील सूत्रांचे म्हणणे आहे. 
 
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई करणे हा राजकीय निर्णय आहे. पण आता पुरे झाला हा संदेश पाकिस्तानला देण्यासाठी असा निर्णय घेणे आवश्यक आहे. २६/११ ते पठाणकोट आपण असे किती हल्ले सहन करणार आहोत ? आता ठोस प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे असे लष्करातील काही अधिका-यांचे मत आहे. 
 
 
काश्मीरमधील रात्रीची गस्त वाढवली
काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानातून सीमापार करुन काही दहशतवादी भारतात घुसले असण्याची शक्यता आहे. अतिरेकी हल्ले रोखण्यासाठी लष्कराकडून मोठया प्रमाणावर शोध मोहिम सुरु असून, रात्रीच्यावेळी गस्त वाढवण्यात आली आहे. वायरलेस संदेशावरुन हे अतिरेकी तालिबानी, अलकायदा आणि इसिसशी संबंधित असू शकतात. पुढील हल्ले रोखण्यासाठी रात्रीच्यावेळी गस्त वाढवण्यात आली आहे. 
 

 

Web Title: Consider the Boundary Action - Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.