‘गुजरातविरोधात विरोधकांचा दिल्लीतून कट’; मोदींनी निवडणुकीपूर्वी तलवार उपसली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 06:16 AM2022-10-12T06:16:34+5:302022-10-12T06:16:46+5:30

मोदींनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसपासून सावध राहण्यास सांगितले.

'Conspiracy of Opposition Against Gujarat from Delhi'; Narendra Modi's alligation | ‘गुजरातविरोधात विरोधकांचा दिल्लीतून कट’; मोदींनी निवडणुकीपूर्वी तलवार उपसली

‘गुजरातविरोधात विरोधकांचा दिल्लीतून कट’; मोदींनी निवडणुकीपूर्वी तलवार उपसली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जमकादोर्णा (गुजरात) : ‘काँग्रेसने आपल्या विरोधात अपशब्द वापरण्याचे कंत्राट दुसऱ्या कोणाला दिले आहे आणि ते स्वत: ग्रामीण मते मिळविण्यासाठी शांतपणे काम करीत आहेत,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केली. विरोधी पक्षाच्या शांतपणे काम करण्याच्या या रणनीतीपासून मी तुम्हाला सावध करतो. मला माहीत आहे की ते दिल्लीतून गुजरातविरुद्ध कट रचत आहेत, असा इशाराही त्यानी दिला.

राजकोट जिल्ह्यातील जामकादोर्णा शहरात एका सभेला संबोधित करताना मोदींनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसपासून सावध राहण्यास सांगितले. पंतप्रधान म्हणाले, त्यांच्या मनात जे काही आले ते माझ्या विरोधात बोलले.

Web Title: 'Conspiracy of Opposition Against Gujarat from Delhi'; Narendra Modi's alligation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.