भारतात कोरोना पसरवण्याचा 'जालिम मुखिया'चा कट उघड, नेपाळ सीमेवर अलर्ट जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 04:36 PM2020-04-10T16:36:56+5:302020-04-10T17:00:32+5:30

नेपाळमधील परसा जिल्ह्यात असलेल्या जग्रनाथपूर गावातील रहिवासी 'जालिम मुखिया' याने भारतात कोरोना पसरवण्याचा कट आखला आहे. तो नेपाळमधून 40 ते 50 कोरोना संक्रमित भारतात पाठवण्याच्या तयारीत असल्याचे समजते

conspiracy of spread coronavirus in india throu the some infected suspects sna | भारतात कोरोना पसरवण्याचा 'जालिम मुखिया'चा कट उघड, नेपाळ सीमेवर अलर्ट जारी

भारतात कोरोना पसरवण्याचा 'जालिम मुखिया'चा कट उघड, नेपाळ सीमेवर अलर्ट जारी

googlenewsNext
ठळक मुद्दे40 ते 50 कोरोना संक्रमित भारतात पाठवण्याची तयारीकुख्‍यात जालिम मुखिया आहे आंतरराष्‍ट्रीय तस्‍करपाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसोबतही जालिम मुखियाचे संबंध असल्याचेही बोलले जाते


नवी दिल्ली -भारतात कोरोना पसरवण्याच्या एका आंतरराष्ट्रीय कटाचा भांडाफोड झाला आहे. यानंतर आता बिहारमधीलनेपाळ सीमेवर सुरक्षा दलाचे जवान सतर्क झाले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारलाही सविस्तर माहिती देण्यात आलीा आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 24 मार्चपासूनच ही सीमा बंद करण्यात आली आहे.

बिहारच्या पूर्व चंपारणमधील रामगडवा पनकोटा एसएसबी 47व्या बटालियनच्या कमांडंटना मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील परसा जिल्ह्यात असलेल्या जग्रनाथपूर गावातील रहिवासी 'जालिम मुखिया' याने भारतात कोरोना पसरवण्याचा कट आखला आहे. तो नेपाळमधून 40 ते 50 कोरोना संक्रमित भारतात पाठवण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

कुख्‍यात जालिम मुखिया हा आंतरराष्‍ट्रीय तस्‍कर आहे. त्याचे थेट पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसोबत संबंध असल्याचेही बोलले जाते. भारतात बनावट नोटा आणि ड्रग्जच्या तस्करीतही त्याचा हात होता. तो अवैध शस्त्राच्या तस्करीसाठीही कुख्यात होता. मात्र, आता त्याने भारतात कोरोनाचा प्रसार करण्याचा कट रचला आहे.

भारत-नेपाल सीमेवर सतर्कतेचा आदेश -
एसएसबी कमांडंट यांच्या सूचनेनंतर आता पश्चिम चंपारणमधील जिल्हाधिकारी कुंदन कुमार यांनी बेतिया आणि बगहा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, बगहा आणि नरकटियागंज येथील उपविभागीय अधिकारी, तसेच सिकटा, मैनाटांड, गौनाहा आणि बगहा येथील गटविकास अधिकाऱ्यांना अलर्ट केले आहे. यासर्वांना भारत-नेपाळ सीमेवर सतर्क राहण्याचे आणि संशयास्पत हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  याशिवाय या पार्श्वभूमीवर बिहारमधील नेपाळ सीमेवरील इतर जिल्ह्यांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
 

Web Title: conspiracy of spread coronavirus in india throu the some infected suspects sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.