केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना गोळी घालण्याचा कट उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:18 AM2023-02-15T11:18:17+5:302023-02-15T11:18:50+5:30

महाशिवरात्रीला त्यांच्यावर गोळी झाडू. या प्रकरणाने हादरलेल्या वैशाली जिल्हा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Conspiracy to shoot Union Minister of State for Home Nityananda Rai revealed | केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना गोळी घालण्याचा कट उघड

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना गोळी घालण्याचा कट उघड

Next

एस. पी. सिन्हा

पाटणा : केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची महाशिवरात्रीच्या दिवशी हत्या करण्याचा कट रचल्याचे प्रकरण समोर आले आहे. 
याबाबतचा एक व्हिडीओ तयार करून युवकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने खळबळ उडाली. या व्हिडीओत म्हटले आहे की, नित्यानंद यांची सुपारी घेऊन महाशिवरात्रीच्या दिवशी गोळी मारण्याची इच्छा आहे. त्यांच्यावर गोळी झाडल्याचे तीन वर्षांपासून स्वप्नात येत आहे. महाशिवरात्रीला त्यांच्यावर गोळी झाडू. या प्रकरणाने हादरलेल्या वैशाली जिल्हा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी हाजीपूरमधील बाबा पाताळेश्वर नाथ मंदिरातून निघणाऱ्या मिरवणुकीत केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्यावर हल्ला करण्याची तयारी करण्यात येत होती. दोन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांनी एक विशेष पथक तयार करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर एका आरोपी युवकाला अटक करण्यात आली. अटकेतील युवकाची चौकशी करण्यात येत असून, या व्हिडीओत दिसणाऱ्या इतर युवकांचा शोध घेतला जात आहे. तसेच युवकाच्या विरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेला माधव कुमार ऊर्फ माधव झा हा युवक वैशाली जिल्ह्यातील गोरौलचा रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी सांची पट्टीच्या एका फ्लॅटमधून अटक केली.

 

Web Title: Conspiracy to shoot Union Minister of State for Home Nityananda Rai revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.