त्रालमधील चकमकीत कॉन्स्टेबल शहीद, दोन दहशतवादी ठार
By admin | Published: March 5, 2017 09:04 AM2017-03-05T09:04:03+5:302017-03-05T12:15:59+5:30
जम्मू आणि काश्मीरमधील त्राल येथे शनिवारी सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 5 - जम्मू आणि काश्मीरमधील त्राल येथे शनिवारी सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल मंजूर अहमद शहीद झाले आहेत. त्याबरोबरच सीआरपीएफचे काही जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, ही चकमक संपली असून, लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. तर दुसरा दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे उघड झाले आहे . शनिवारी संध्याकाळी जेव्हा चकमकीस सुरुवात झाली तेव्हा लष्कराने दहशतवादी लपलेल्या घराला घेराव घातला होता. दरम्यान, लष्कराच्या कारवाईत या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र तरीही गोळीबार सुरू होता. गेल्यावर्षी लष्करासोबत झालेल्या चकमकीत ठार झालेला बुऱ्हाण वानी याच परिसरात राहत होता.
#UPDATE Tral (J&K) encounter: Two terrorists have been gunned down by security forces, operation ends. combing underway
— ANI (@ANI_news) March 5, 2017
Out of two terrorists killed in Tral encounter, one of them is a top Hizbul Mujahideen commander and the other is a Pakistani national
— ANI (@ANI_news) March 5, 2017