सतत सेक्स केल्याने आयुष्य कमी होतं

By Admin | Published: December 29, 2014 07:05 PM2014-12-29T19:05:40+5:302014-12-29T19:05:40+5:30

सतत सेक्स केल्याने आयुष्य क्मी होतं. असं वक्तव्य भोपाळ येथील खासदार अलोक संजर यांनी केले आहे. ते एका टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या कार्यक्रमात बोलत होते.

Constant sex reduces life | सतत सेक्स केल्याने आयुष्य कमी होतं

सतत सेक्स केल्याने आयुष्य कमी होतं

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
भोपाल, दि. २९ - सतत सेक्स केल्याने आयुष्य क्मी होतं. असं वक्तव्य भोपाळ येथील खासदार अलोक संजर यांनी केले आहे. ते एका टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अलोक यांनी शास्त्रांचा दाखला देत सेक्स हा पवित्र भावनांनी केल्यास त्यातून संतानप्राप्ती होते. परंतू आज काल सेक्स म्हणजे खेळ झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या भाषणात त्यांनी श्रीकृष्ण आणि एका सामान्य व्यक्तीच्या संवादाचे उदाहरण दिले. एकदा श्रीकृष्णाला एका सामान्य नागरिकाने विचारले की, शरीर संबंध केव्हा ठेवावेत, यावर श्रीकृष्णांनी उत्तर दिले की, ज्यावेळी संतानप्राप्ती करावयची असेल त्यावेळी शरीर संबंध ठेवावेत. १२ वर्षातून एकदा शरीरसंबंध ठेवाववेत असा सल्ला श्रीकृष्णाने त्या व्यक्तीला दिला यावर त्याव्यक्तीने वर्ष सहा महिन्यातून संबंध ठेवल्यास काय होईल असे विचारले असता श्रीकृष्णाने मग तू कफन जवळ बाळग असा सल्ला दिला. यावरून आपण बोध घ्यायला हवा असं संजर यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे. देशभर भाजपाचे नेते वेग वेगळी विधानं करून माध्यमांना विषय पुरवत असताना संजर यांनीही सेक्सवर भाष्य करून प्रसारमाध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. 
 

 

Web Title: Constant sex reduces life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.