मतदारसंघ आढावा / गुदले यांना
By admin | Published: May 5, 2015 01:20 AM2015-05-05T01:20:56+5:302015-05-05T01:20:56+5:30
दाखविणे
Next
द खविणेकुंकळ्ळीतील मतदार योग्य नेतृत्वाच्या प्रतिक्षेतभाजपाचा ग्राफ उतरला- काँग्रेसचीही शकले पडलीकुंकळ्ळी:प्रतिनिधी.कुंकळ्ळी: ऐतिहासिक महत्व असलेल्या कुंकळ्ळी मतदारसंघात भाजपाने गेल्या विधासभेच्या निवडणुकीत राजन नाईक यांच्या रूपाने सासष्टीतील एकमेव आमदार निवडून आणून नवा किर्तिमान स्थापीत केला.स्वता भाजपानेही स्वप्नात देखील अपेक्षित केले नव्हते ते कुंकळ्ळीत घडले.कोंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कुंकळ्ळी मतदारसंघाला खिंडार पाडण्यात भाजपाला यश आले हे सत्य आपण नाकारू शकणार नाही.भाजपा कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामूळे व कोंग्रेसच्या मतात झालेल्या मतविभाजनाचा भाजपाला फायदा झाला व भाजपाचे आमदार राजन नाईक कुंकळ्ळी मतदारसंघातील प्रथम हिंदू आमदार बनले.स्वातंत्र्या नंतर झालेल्या एकही निवडणुकीत कुंकळ्ळी मतदारसंघात हिंदू आमदार बनला नव्हता.राजन नाईकनी हा रिकोर्ड ब्रेक केला.कुंकळ्ळी मतदारसंघात ख्रिस्ती मतदारांची संख्या ज्यास्त.कुंकळ्ळी नगरपालिका क्षेत्र, आंबवली,बाळ्ळी अडणे पंचायतीचा काही भाग,परोडा पंचायत,माकाझाना पंचायत ,गिरदोली व चांदोर या पंचायत क्षेत्रांचा कुंकळ्ळी मतदारसंघात समावेश होतो.गेल्या विधानसभेच्या फेररचनेत बाळ्ळी व आंबावली या पंचायत क्षेत्रांचा समावेश कुंकळ्ळी मतदारसंघा झाल्या नंतर मतांचे समिकरण बदलले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.कुंकळ्ळी मतदारसंघात हेट्रिक करण्याची संधी कोणत्याच आमदाराला लाभली नाही. डोक्टर माझारेलो, रोक सांतान फेर्नाडिस,उच्च न्यायालयाचे सेवा निवृत न्यायाधिश फेरदिन रिबेलो , मानू फेर्नाडिस,मारियो वाझ, आरेसियो डिसोझा व ज्योकीम आलेमाव यानी कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले.जरी हा मतदारसंग्थ कोंग्रेसचा बालेकिल्ला असला तरी कोंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविलेले विद्यमान खासदार शांताराम नाईक याना या मतदारसंघात पराभव स्विकारावा लागला होता.थोर स्वातत्र्य सेनानी शाबू देसाई, दत्ताराम देसाई, व मोती देसाई या हिंदू नेत्याना या मतदारसंघातील मतदारानी स्विकारले नाही अपवाद आहे विद्यमान आमदार राजन नाईक.परिवर्तानाच्या लाटेवर स्वार होऊन मतदारानी भाजपाला मतांचे दान दिले खरे मात्र भाजपा मतदाराना दिलेया आश्वासनाला जागला कां? का खरा प्रश्न आहे.गेल्या सव्वा तिन वर्षाच्या कालावदीत कुंकळ्ळी मतदारसंघात एकही प्रकल्प उभा राहिला नाही.विकासाची जी गती माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यानी दिली होती त्या विकासाला या मतदारसंघात खंड पडला आहे.भाजपाचे आमदार राजन नाईक हे तसे थंड स्वभावाचे आणि त्यांच्या स्वभावा प्रमाणे विकासही थंडपणे चालला आहे.या मतदारसंघात भाजपाचा ग्राफ उतरत असल्याचे अनेक घटणानी सिद्ध करून दाखविले आहे.जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपा गिरदोली मतदारसंण्घात सपाटून मार खावा लागला.माकाझाना पंचायत क्षेत्रातील मतदारानी कोंग्रेस समर्थक उमेदवार क्लाफासियो डायस याना स्विकारले. राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता असतानाही कुंकळ्ळी पालिकेवर भाजपाची सत्ता आणण्यात आमदार नाईक याना अपयश आले.कोंग्रेस समर्थक नगराध्यक्ष लेंन्ड्री मास्कारेनस यांच्यावर भाजपाने आणलेला अविश्वास ठराव बारगळला. बाळ्ळी पंचायत सोडल्यास एकही पंचायतीवर भाजपा समर्थक सरपंच नाही.पालिकाही भाजपाच्या हातात नाही.भाजपाचा आमदार असलेल्या या मतदारसंघात भाजपाचा जिल्हा पंचायत सदस्य नाही याचाच अर्थ असा होतो की येणा-या काळात भाजपाला अच्छे दिन दिसणे कठीण दिसते.आमदार राजन नाईक हे अजातशत्रू असल्यामूळे मतदारांची त्याना सहानभुती आहे मात्र भाजपा कार्यकर्त्यांची कामे होत नाही असा सूर भाजपा कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे.अनेक कार्यकर्ते भाजपा कडून लांब जायला लागल्याचे कित्र दिसते.अशा स्थितीत येणा-या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा कुंकळ्ळीची जागा राखण्यात यशस्वी ठरणार कां? का लाख मोलाचा प्रश्न आहे.विद्यमान आमदार राजन नाईकना पुन्हा निवडणुकीत उतरण्यात रस नसल्याचे कळते.आमदार नाईक यानी या प्रकरणी जाहीर घोषणा केली नसली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना आमदार नाईक पुन्हा निवडणुकीत उतरणाण्यात इच्छूक नसल्याचे वाटते.आमदार नाईक जर निवडणुकीत उतरले नाही तर त्यांची जागा घेण्याच्या दर्ज्याचा दुसरा नेता भाजपा कडे सद्या तरी आहे असे दिसत नाही.माजी आमदार व माजी मंत्री आरेसियो डिसोझा हे पुढील विधानसभेची निवडनूक भाजपाच्या उमेदवारीवर लढण्यात इच्चूक असल्याचे कळते.मात्र राजकिय अज्ञातवासात गेलेल्या आरेसियो डिसोझाना भाजपाची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.भाजपाच्या उमेदवारीसाठी आणखी दोन स्थानिक कार्यकर्ते इच्चूक असल्याचे कळते.जर सांगे मतदारसंघ राखीव घोषीत केला तर भाजपाची उमेदवारी सांगेचे आमदार सुभाष फळदेसाईना द्यावी अशा मताचा एक गट भाजपात सक्रीय आहे.केपेचे आमदार चंद्रकांत कवळेकर ही कुंकळ्ळी मतदारसंघासाठी प्रयत्नशील असल्याच्या अफवा या मतदारसंघात कानावर पडतात.केपे मतदारसंघ राखीव घोषीत केल्यास केपेचे आमदार कुंकळ्ळीतून निवडनूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोंग्रेस पक्षाचे काम या मतदारसंघात ठप्प झाले असले तरी पुढील निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अनेक जण घुडग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. जो मतदारसंघ एकेकाळी कोंग्रेसचा बालेकिल्ला होता त्या मतदारसंघात कोंग्रेसचे नावही ऐकायला मिळत नाही. योग्य नेतृतवाच्या अभावी कोंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अनाथ झाले आहेत.भाजपा सरकारकडून सतावणूक होत असल्याच्या तक्रारी कोंग्रेस कार्यकर्त्यां कडून ऐकायला मिळतात मात्र कोंग्रेसच्या नेत्यानी हा मतदारसंघ वा-यावर सोडल्यासारखे चित्र दिसत आहे.माजी आमदार व माजी मंत्री ज्योकीम आलेमाव पुन्हा एकदां या मतदारसंघात कमबेक करण्याच्या तयारीत आहेत.ज्योकीम आलेमाव यानी अजुन या मतदारसंघात आपल्या कार्याची सुरवात केली नसली तरी कार्यकर्त्यांची जुळवा जुळव सुऊ झाल्याचे कळते.कुडतरी जिल्हा पंचायत मतदारसंघातून विक्रमी मतानी विजयी झालेले जिल्हा पंचायत सदस्य क्लेफासियो डायस यानी कुंकळ्ळी मतदारसंघातून पुढील विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे.क्लेफासियो डायस यानी आपल्या प्रचार कार्याला सुरवात ही केलेली आहे.गिरदोली,परोडा,चांदरा ,माकाझाना व आंबावली या भागात क्लेफासियो डायस यांची पकड असून कोंग्रेसच्या उमेदवारीसाठी त्यानी दावा केला आहे.गेल्या विधासभेच्या निवडणुकीत ज्योकीम आलेमाव यांचा पराभव करण्यात महत्वाची भुमिका बजावलेले व पाच हजाराच्या जवळपास मते घेतलेले जोन मोंतेरो यानीही कोंग्रेसच्या उमेदवारीवर दावा सांगितला आहे.कुंकळ्ळी पालिकेचे माजी नगराध्यक्ष देवेंद्र देसाई हेही कोंग्रेसच्या उमेदवारीसाठी दावेदार आहेत.या व्यतिरिक्त सेवा निवृत पोलिस अधिक्षक टोनी फेर्नाडिस, सरकारी अधिकारी असलेले एल्वीस गोमीश यांचीही नावे भावी उमेदवार म्हणून घेतली जात आहेत.कोंग्रेस पक्षाने जर आता पासूनच जोर लावला व आपसातील मतभेत विसरून एकसंघपणे लढा दिल्यास येणारी विधानसभेची निवडनूक भाजपासाठी जड जाऊ शकते.मात्र कोंग्रेसची अनेक शकले पडली आहेत. कुंकळ्ळीत ज्योकीम कोंग्रेस,जोन कोंग्रेस,देवेंद्र कोंग्रेस,मोती कोंग्रीस, क्लेफासियो कोंग्रेस अशी अनेक शकले पडल्यामूळे कोंग्रेसचे भवितव्य अंधारमयच दिसते. पुन्हा एकदा आपले नशीब आजमवण्यास तयार असलेल्या ज्योकीम आलेवानी गेल्या सव्वा तिन वर्षांत आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस केली नसल्यामूळे हे कार्यकर्ते पुन्हा त्याना पाठिंबा देणे जर अवघड वाटते.जोन मोंतेरोने गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून बरीच मते घेतली होती या मतविभाजनाचा फायदा झाल्यामूळे भाजपाला विजय मिळाला होता.मात्र जोन मोंतेरो यांचाही ग्राफ आता उतरल्याचे जाणवत आहे.जिल्हा पंचाय निवडणुकीत मोंतेरो व आलेमाव यानी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले होते.मोंतेरो यानी गेल्या विधानसभेच्या निवडनुकीत भाजपाकडे फिक्सिंग केले होते व आता त्यानी ज्योकीम आलेमाव यांच्याकडे हातमिळवणी केल्याची चर्चा कुंकळ्ळीत सुरू झालेली आहे अशा स्थितीत त्याना कोंग्रेसची उमेदवारी मिळणे कठीण वाटते आणि उमेदवारी मिळाल्यास मतदारांचा आशिर्वाद लाभणे अवघड आहे.देवेंद्र देसाई यांचा तसा दांडगा लोक संपर्क आहे मात्र कुंकळ्ळी पालिका क्षेत्र व बाळ्ळी पंचाय क्षेत्र वगळता इतर ठिकाणी त्यांचे कार्य नगण्य आहे.शिवाय हिंदू असल्यामूळे त्याना ख्रिस्ती मतदार स्विकारणार की नाही हाही प्रश्न आहे.मात्र देसाई हे धडपडी उभरते नेते असून कोंग्रेसच्या पुण्याईवर राजन नाईक प्रमाणे ते किर्तीमान स्थापित करू शकतात. जिल्हा पंचाय सदस्य क्लेफासियो डायस यांचा पालिका क्षेत्रात प्रभाव नगण्य आहे.बाळ्ळी भागातही त्यांना लोक ओळखत नाहीत,अशा स्थितीत सत्तर टक्के मतदारअसलेल्या कुंकळ्ळी व बाळ्ळी करांच्या सहकार्या शिवाय आमदार बनणे अशक्य आहे. डायस यांचा चांदरा,गिरदोली,परोडा,माकाझान व आंबावली या क्षेत्रात बराच प्रभाव आहे आमदार बनण्यासाठी त्याना कुंकळ्ळीकरांचा विश्वास संपादन करावा लागणार हे निश्चीत.भाजपाचे राजन नाईक यानी निवडणुक लोक दबामूळे पुन्हा लढल्यास त्याना ही निवडणुकीत सोपी जाणार नाही हे निश्चीत.कुंकळ्ळी मतदारसंघातील लोक आतां ज्योकीम आलेमावाची दहा वर्षे व राजन नाईकांची सव्वा तिन वर्षे यांची तुलना करायला लागले आहेत.तुलनात्मक दृष्टीने पाहिल्यास आलेमावानी जो विकासाचा धडाका लावला होता त्याच्या पाच टक्केही विकास कामे गेल्या सव्वा तिन वर्षांत झालेली नाही हे सत्य कोणिही नाकारू शकणार नाही.मात्र विकासकामावरून मतदार मतदान करीत नाहीत हेही तेवढेच सत्य आहे.विकास कामाचा धडाका लावलेल्या ज्योकीम आलेमावाना कुंकळ्ळीकरानी घरचा रास्ता दाखविला हा इतिहास आपण विसरलो नाही. बोडी लेंग्वेज वरून आमदार नाईकाना सेकंड इनिंगची इच्छा नसल्याचे स्पष्ट जाणवते.अशा स्थितीत आमदार नाईक यांच्या शिवाय दुसरा कोणता चेहरा भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरवितात त्यावरून भाजपाचे भवितव्य निर्भर आहे.एकमात्र खरे आणखी पंधरा दिवसानी निवडणुक झाल्यास व कोंग्रेसने सर्व शक्तीने ही निवडणूक लढल्यास कोंग्रेस आपला बालेकिला पुन्हा एकदा सर करू शकते.भाजपाला कुंकळ्ळी मतदारसंघ राखण्यासाठी विकासाची गंगा आणावी लागणार निवडणुकीत दिलेली आश्वासनाची पुर्तत्वा करावी लागणार.ज्याना नोकरीची आश्वासने दिली होती ती आश्वासने पूर्ण करावी लागणार.कोंग्रेसला पुन्हा आपला बालेकिल्ला सर करण्यासाठी संघटीतपणे लढा द्यावा लागणार आपले हेवेदावे सोडून पक्षाच्या विजयासाठी लढाई द्यावी लागणार.सद्या हा मतदारसंघ योग्य नेतृत्वाच्या शोधात आहे.ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-05कॅप्शन: राजन नाईकढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-04कॅप्शन: ज्योकीम आलेमावढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-07कॅप्शन: जॉन मोन्तेरोढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-06कॅप्शन: क्लाफासियो डायस