BREAKING: ओबीसी आरक्षणाच्या दिशेनं मोठं पाऊल! लोकसभेत संविधान संशोधन विधेयक मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 08:59 PM2021-08-10T20:59:45+5:302021-08-10T21:00:59+5:30

OBC Bill: लोकसभेत संविधान (१२७वं) संशोधन बिल The Constitution (One Hundred and Twenty Seventh) Amendment Bill मंजूर झालं आहे. ...

constitution 127th amendment bill passed in lok sabha obc reservation | BREAKING: ओबीसी आरक्षणाच्या दिशेनं मोठं पाऊल! लोकसभेत संविधान संशोधन विधेयक मंजूर

BREAKING: ओबीसी आरक्षणाच्या दिशेनं मोठं पाऊल! लोकसभेत संविधान संशोधन विधेयक मंजूर

Next

OBC Bill: लोकसभेत संविधान (१२७वं) संशोधन बिल The Constitution (One Hundred and Twenty Seventh) Amendment Bill मंजूर झालं आहे. मत विभाजनच्या माध्यमातून या विधेयकासाठीचं मतदान संसदेत घेण्यात आलं आणि या विधेयकाच्या बाजूनं ३८५ जणांनी कौल दिला. तर विरोधात एकही मत पडलं नाही. त्यामुळे हे विधेयक बहुमतानं मंजुर झालं आहे. (constitution 127th amendment bill passed in lok sabha obc reservation)

विधेयकावर लोकसभेत सविस्तर चर्चा झाली. यात नव्या विधेयकामुळे राज्य सरकारांना ओबीसींची लिस्ट तयार करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे आणि यातून मराठा आरक्षणासारख्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर राज्य सरकारांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे, असं सरकारच्या वतीनं लोकसभेत सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही या विधेयकाचं समर्थन केलं आहे. यासोबतच सभागृहात आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून वाढविण्याचीही मागणी करण्यात आली आहे. 

संसदेच्या यावेळीच्या सत्रात आज पहिलाच असा दिवस होता की एखाद्या विधेयकावर शांतीपूर्ण पद्धतीनं चर्चा केली गेली. संपूर्ण विरोधी पक्षानं ओबीसी आरक्षणासंदर्भात निगडीत विधेयकाला समर्थन दिलं. यासोबतच काही पक्षांनी ओबीसी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढविण्यासाठीची व्यवस्था निर्माण केली जावी अशी मागणी केली आहे. 

Web Title: constitution 127th amendment bill passed in lok sabha obc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.