"राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोनाचा शेवट सुरू होईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 03:49 PM2020-07-23T15:49:22+5:302020-07-23T15:59:01+5:30

राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होताच कोरोना संकट दूर होईल; भाजपा नेत्याला विश्वास

Construction of Ram Mandir in Ayodhya Will End Coronavirus in India Says BJP Leader | "राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोनाचा शेवट सुरू होईल"

"राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोनाचा शेवट सुरू होईल"

Next

भोपाळ: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. काल दिवसभरात देशात तब्बल ४५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा साडे बारा लाखांच्या जवळ पोहोचला. तर कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या आसपास आहे. त्यातच कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तरी येणार नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केल्यानं संकट आणखी गहिरं झालं आहे. कोरोनावरील लस येण्यास अजून बराच कालावधी लागणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

एका बाजूला संशोधक कोरोनावरील लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असताना, त्यांच्या चाचण्यांसाठी अविरत प्रयत्न करत असताना भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वेगळाच दावा केला आहे. अयोध्येत राम मंदिरासाठी (Ram Mandir Ayodhya) भूमिपूजन झालं, मंदिराच्या कामाला सुरुवात झाली की कोरोनाचा शेवट सुरू होईल, असं मध्य प्रदेश विधानसभा उपाध्यक्ष आणि भाजपा नेते रामेश्वर शर्मा यांनी म्हटलं आहे.

'दानवांचा खात्मा करण्यासाठी आणि माणसांच्या कल्याणासाठी प्रभू रामांनी वेळोवेळी पुनर्जन्म घेतले आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोनाचा खात्मा सुरू होईल,' असा विश्वास शर्मा यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. 'भारतच नव्हे, तर संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. आपण या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत. याशिवाय आपल्या देवांचंही स्मरण करत आहोत,' असं ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल. श्रीराम जन्मभूमी विश्वस्त मंडळाचे खजिनदार स्वामी गोविंदगिरी यांनी ही माहिती दिली. या सोहळ्यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचं पालन करण्यात येईल. कार्यक्रमाला २०० पेक्षा जास्त जण उपस्थित नसतील, असंदेखील त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी हनुमान गढी, राम लल्लांच्या मंदिराला भेट देतील. त्यानंतर ते वृक्षारोपण करतील. मग भूमिपूजन होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?"

Web Title: Construction of Ram Mandir in Ayodhya Will End Coronavirus in India Says BJP Leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.