राममंदिर निर्माणाला सहा महिन्यांत होणार सुरुवात : नृत्य गोपाल दास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 11:47 AM2020-02-29T11:47:08+5:302020-02-29T11:48:13+5:30
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित अयोध्या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमात नृत्य गोपाल दास बोलत होते. अयोध्येत भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. त्याच्या नकाशाला व्यापक आकार देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
नवी दिल्ली - श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी अयोध्यातील राममंदिरासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. पुढील सहा महिन्यांत राममंदिर निर्माणाचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील दोन-तीन वर्षांत मंदिर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित अयोध्या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमात नृत्य गोपाल दास बोलत होते. अयोध्येत भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. त्याच्या नकाशाला व्यापक आकार देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्र्येय होसबले म्हणाले की, दिल्लीचा स्वभाव कायमच वादग्रस्त राहिला आहे. नेहमी अयोध्येला दाबण्यात आले आहे. त्यामुळे देश जसा असायला हवा होता, तसा नाही. आता मात्र प्रतीक्षा संपली आहे. दिल्लीत अयोध्या आणण्याचा प्रयत्न सुरू असून ज्या दिवशी दिल्लीवर अयोध्येचे वर्चस्व राहिल त्या दिवशी भारताचा पुनरोदय होईल, असंही होसबले यांनी सांगितले.
प्रभू रामचंद्र केवळ आराध्य दैवत नाही. ते भारताची आत्मा आहे. संस्कृतीची ओळख आणि अस्मिता आहे. यावेळी होसबले यांनी राममनोहर लोहिया यांच्याद्वारे चित्रकूट येथे आयोजित करण्यात आलेल्या रामायण यात्रेचा देखील उल्लेख केला.