बांधकाम कामगारांनाही आता मिळणार पेन्शन, केंद्र सरकार जारी करणार नॅशनल कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 10:00 IST2023-06-29T09:57:48+5:302023-06-29T10:00:04+5:30
Construction worker: केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्ड जारी करण्याचा विचार करीत आहे.

बांधकाम कामगारांनाही आता मिळणार पेन्शन, केंद्र सरकार जारी करणार नॅशनल कार्ड
नवी दिल्ली : केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्ड जारी करण्याचा विचार करीत आहे. बांधकाम व घरबांधणी कामगारांसाठी (बीओसीडब्ल्यू) चालविण्यात येत असलेल्या योजनांची व्याप्ती वाढविण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे.
बीओसीडब्ल्यू फंडातील उपलब्ध निधीचा उपयोग लाखो असंघटित कामगारांना निवृत्ती वेतन देण्यासाठी व अन्य सामाजिक सुरक्षा योजनांसाठी केला जाऊ शकतो. ४०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम राज्य सरकारांकडे खर्चाविना पडून आहे.