वजन कमी करायचंय तर सीबीआयशी संपर्क साधा - कार्ती चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 18:30 IST2018-03-13T18:30:19+5:302018-03-13T18:30:19+5:30
आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोपाखाली ते सीबीआय कोठडीत आहेत.

वजन कमी करायचंय तर सीबीआयशी संपर्क साधा - कार्ती चिदंबरम
नवी दिल्ली - सीबीआयमुळे भूक मेली असून वजनही कमी झालं आहे. जर वजन कमी करायचे असेल तर सीबीआयशी संपर्क करा असे विधान सीबीआय कोठडीमध्ये असलेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोपाखाली ते सीबीआय कोठडीत आहेत.
काल सोमवारी एका स्पेशल कोर्टाने सुनावणी दरम्यान कार्ती चिदंबरम यांना 24 मार्च पर्यंत नवी दिल्ली येथील तिहार तुरुंगात पाठवले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना कार्ती म्हणाले की, माझी भूक मेली आहे, सध्या माझे जेवणही कमी झाले आहे. त्यामुळं माझे वजन खूप कमी झालं आहे. वजन कमी होणं ही चांगली गोष्ट आहे.
यावेळी हसत ते म्हणाले की, माझे वजन एवढे कमी झाले आहे की मला जुने कपडे सैल होत आहेत. जर कोणाला वजन कमी करायचे असल्यास सीबीआयशी संपर्क साधा. सीबीआय आधिकाऱ्याबद्दल आपली कोणतीही तक्रार नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. सर्वजण प्रोफशनली आपलं काम करत आहेत. कार्ती म्हणाले की, सीबीआय कस्टडीदरम्यान, मोबाईल आणि घड्याळही सोबत ठेवण्याची परवानगी नाही.
कार्ती चिदंबरम यांच्यावर शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता.