राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 12:30 AM2021-02-17T00:30:06+5:302021-02-17T00:30:40+5:30
Rajdeep Sardesai : घटनेच्या कलम १२९ अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांवर वारंवार टीका करून न्यायालयाची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधातील अवमान याचिका दाखल करून घेतली.
आस्था खुराना यांनी वकील ओमप्रकाश परिहार यांच्यातर्फे राजदीप सरदेसाई यांच्याविरोधातील याचिका दाखल केली. घटनेच्या कलम १२९ अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निकालांवर सातत्याने नकारात्मक टिपणी करून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सरदेसाई यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याचसंदर्भात सरदेसाई यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची संमती देण्यास महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी नकार दिला होता. सरदेसाई यांनी जाणीवपूर्वक ट्वीट करून न्यायालयाची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप का लावला जाऊ नये, असा सवाल याचिकाकर्त्यांनी केला आहे.