कंत्राटी नोकर भरतीचा चेंडू सहकार खात्याच्या कोर्टात

By Admin | Published: August 22, 2016 11:33 PM2016-08-22T23:33:55+5:302016-08-22T23:47:50+5:30

जिल्हा बॅँकेने मागविले मार्गदर्शन

Contractor's recruitment to the Cooper's Court | कंत्राटी नोकर भरतीचा चेंडू सहकार खात्याच्या कोर्टात

कंत्राटी नोकर भरतीचा चेंडू सहकार खात्याच्या कोर्टात

googlenewsNext

जिल्हा बॅँकेने मागविले मार्गदर्शन
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची वादग्रस्त ठरलेली कंत्राटी नोकरभरती स्थगितीच्या आणि रद्द होण्याच्या हिंदोळ्यावर झुलत आहे. या भरतीबाबत नेमके काय करावे? याबाबतचे मार्गदर्शन आता जिल्हा बॅँकेच्या विभागीय सह निबंधक कार्यालयाकडे मागविल्याचे वृत्त आहे.
शनिवारी (दि.२०) झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांनी ही कंत्राटी नोकरभरती रद्द करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे बैठकीआधीच प्रसारमाध्यमातून जाहीर केले होते. त्यामुळेच की काय? या कंत्राटी कर्मचार्‍यांनी थेट कामगार न्यायालयात या कंत्राटी नोकरभरतीस रद्द करू नये, म्हणून अर्ज केला. त्यानुसार कामगार न्यायालयाने ही भरतीप्रक्रिया रद्द करू नये, म्हणून जिल्हा बॅँकेला आदेश दिल्याचे पत्र या कंत्राटी कर्मचार्‍यांनी बॅँकेकडे दिले होते. त्या पत्रावरच संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. त्यातच विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी ही कंत्राटी नोकरभरती नियमानुसार नसल्याने ३० ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचे आदेश जिल्हा बॅँकेला दिले आहेत. सोमवारी जिल्हा बॅँकेच्या काही अधिकार्‍यांनी विभागीय सहनिबंधक कार्यालय गाठून त्यांच्याकडे ही कंत्राटी नोकरभरती कशी व कोणत्या नियमाखाली रद्द करावी? याबाबत मार्गदर्शन मागविल्याचे कळते. जिल्हा बॅँकेच्या अधिकार्‍यांनी कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामगार न्यायालयात याबाबत दाखल केलेली याचिका व त्याबाबतचे आदेशही सहकार विभागाला सादर केले. याबाबत सहकार विभागाने काय कार्यवाही करायची त्याबाबत लवकरच जिल्हा बॅँकेला कळविण्यात येईल, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे कंत्राटी नोकरभरतीचा चेंडू आता सहकार विभागाच्या कोर्टात असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Contractor's recruitment to the Cooper's Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.