दिल्ली नियंत्रणात; बिहार बंदला हिंसक वळण, ४0 जणांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 06:52 AM2019-12-22T06:52:03+5:302019-12-22T06:52:55+5:30

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध आंदोलन सुरूच। दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी ४0 जणांना घेतले ताब्यात

In control of Delhi; Violent turn to Bihar bandh | दिल्ली नियंत्रणात; बिहार बंदला हिंसक वळण, ४0 जणांना घेतले ताब्यात

दिल्ली नियंत्रणात; बिहार बंदला हिंसक वळण, ४0 जणांना घेतले ताब्यात

Next

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरुद्ध आंदोलन सुरू असतानाच नवी दिल्लीत हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत आहे. दिल्लीचा जुना भाग आणि सीमापुरीमध्ये सुरक्षा दलाला तैनात करण्यात आलेले आहे. जुन्या दिल्लीत दरियागंज आणि उत्तरपूर्व दिल्लीच्या सीमापुरीमध्ये शुक्रवारी दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. दरियागंज व्यापारी संघाचे सचिव मनीष सेठ यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी या भागातील सर्व दुकाने उघडली आणि कोणतीही अशांतता नाही. शाहदरा जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे.

दगडफेक करणाºया ५ जणांना घेतले ताब्यात
उत्तर पूर्व दिल्लीत आंदोलनादरम्यान दगडफेक केल्याच्या आरोपात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत अतिरिक्त पोलीस उपायुक्त रोहित राजबीर सिंह जखमी झाले होते.


शिक्षण क्षेत्रातील १००० जणांचे कायद्याला समर्थन
देशातील विविध विद्यापीठांतील, शिक्षण क्षेत्रातील १००० पेक्षा अधिक नागरिकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समर्थन देत एक निवेदन जारी केले आहे. यात राज्यसभा सदस्य स्वपन दासगुप्ता, आयआयएम शिलाँगचे अध्यक्ष शिशिर बजोरिया, नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरू सुनैना सिंह, जेएनयूतील प्रोफेसर ऐनूल हसन, अभिजित अय्यर मित्रा, कंचन गुप्ता यांचा समावेश आहे.

दरियागंजमध्ये १५ जणांना अटक
जुन्या दिल्लीच्या दरियागंजमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी १५ लोकांना अटक करण्यात आली आहे. दंगल करणे, पोलिसांच्या ड्यूटीमध्ये अडथळा आणण्यासाठी बळाचा वापर करणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांनी शुक्रवारी सायंकाळी सुभाष मार्ग भागात एका उभ्या कारला आग लावली होती. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.

भीम आर्मीच्या प्रमुखांना १४ दिवसांची कोठडी
च्भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना शनिवारी जामा मशिदीच्या बाहेर ताब्यात घेण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
च्आझाद म्हणाले की, आम्हाला बलिदान द्यावे लागेल जेणेकरून कायदा परत घेण्यात यावा. आम्ही हिंसाचाराचे समर्थन करीत नाही. आम्ही शुक्रवारी सकाळी मशिदीच्या आत बसलो होतो. आमचे लोक हिंसाचारात सहभागी नव्हते.
मध्यप्रदेशात ३५ अटकेत
च्मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी पोलिसांनी ३५ लोकांना अटक केली आहे.
च्शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर शहरातील काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दगडफेकीत २० पोलीस जखमी झाले होते. यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. शहरातील गोहलपूर आणि हनुमानताल भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
‘ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांना वकिलांना भेटू द्या’
च्दरियागंजमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या ४० लोकांना त्यांच्या वकिलांना भेटू द्या, असे निर्देश दिल्लीच्या एका न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
च्ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जे जखमी आहेत त्यांना उपचार उपलब्ध करून द्या, असे निर्देश देतानाच न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखादा अल्पवयीन या आंदोलनात कथित स्वरूपात सहभागी असेल तरीही त्याला ताब्यात घ्यायला नको.
च् त्याच्यावर कायद्यानुसारच कारवाई करायला हवी. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलेल्या ८ अल्पवयीनांना सोडून देण्यात आले आहे.

Web Title: In control of Delhi; Violent turn to Bihar bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.