काळा पैसा रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष
By admin | Published: September 24, 2014 02:45 AM2014-09-24T02:45:22+5:302014-09-24T02:45:22+5:30
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने मुंबईत २४ तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष आणि तक्रार हाताळणी केंद्र सुरू केले
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने मुंबईत २४ तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष आणि तक्रार हाताळणी केंद्र सुरू केले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्राप्तिकर विभागाने याबाबतच्या तक्रारी जनतेकडून स्वीकारण्यासाठी एक हेल्पलाइन सुरू केली आहे. मुंबईमध्ये कोणीही व्यक्ती संशयास्पद स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम किंवा सोने यांसारख्या वस्तू नेताना आढळल्यास त्याबाबत ०२२-२२६३५५११, २२६२७२७५ आणि १८००-०२२-०११५ (टोल फ्री) या क्रमांकावर तक्रार करावी. कोणीही व्यक्ती मोठ्या प्रमाणावर रक्कम किंवा सोने यांसारख्या वस्तू नेताना आढळल्याची तक्रार प्राप्तिकर विभागाला मिळाल्यानंतर प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार सदर प्रकरणाची चौकशी केली जाईल. आणि जर त्या व्यक्तीकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नाही तर ती रक्कम किंवा सोने जप्त करण्यात येईल. मोठ्या प्रमाणावर रक्कम किंवा सोने नेत असताना नागरिकांनी अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र आणि पॅनकार्ड सोबत ठेवावे, अशी सूचना प्राप्तिकर विभागाने केली आहे. (प्रतिनिधी)