सम-विषम योजनेमुळे दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण
By admin | Published: January 2, 2016 10:57 AM2016-01-02T10:57:25+5:302016-01-02T10:58:20+5:30
वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने लागू केलेल्या सम-विषम योजनेमुळे इतर दिवसांच्या तुलनेत दिल्लीत शुक्रवारी १० टक्के कमी प्रदूषण झाल्याची माहिती समोर येत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लागू केलेल्या महत्त्वाकांक्षी सम-विषम योजनेमुळे इतर दिवसांच्या तुलनेत राजधानीत शुक्रवारी १० टक्के कमी प्रदूषण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सम-विषम योजना यशस्वी ठरताना दिसत आहे.
सम-विषम तारखेला चारचाकी वाहने त्यांच्या सम-विषम क्रमांकानुसार रस्त्यावर उतरवण्याची नवी योजना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणली असून या योजनेला पहिल्याच दिवशी १ जानेवारी ( शुक्रवार) चांगला प्रतिसाद मिळाला आणि कारच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. परिणामी पहिल्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान १० टक्के प्रदूषण कमी आढळले. तसेच स्त्यांवर वाहनाची गर्दी नसल्यामुळे प्रवासी खूष दिसून आले. मात्र ही योजना नेमकी किती परिणामदायी आहे, हे दोन-तीन दिवसांनीच स्पष्ट होऊ शकेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
दिल्लीच्या मंत्र्यांनी मोटरबाईक, ई-रिक्षा, बस व भाड्याच्या कारसारख्या विविध वाहनांचा वापर करीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी सचिवालय गाठले. पर्यटन मंत्री कपिल मिश्रा हे सकाळी ९ च्या सुमारास बाईकने सचिवालयात आले.