भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मृत्युवर वादग्रस्त पोस्ट, पत्रकारासह दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 01:10 PM2021-05-17T13:10:52+5:302021-05-17T13:12:26+5:30

Controversial post on death of BJP state president : एक पत्रकार आणि एका राजकीय कार्यकर्त्याला कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या भाजपा प्रदेशाध्यक्षांबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लिहिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Controversial post on death of BJP state president, two arrested along with a journalist | भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मृत्युवर वादग्रस्त पोस्ट, पत्रकारासह दोघे अटकेत

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मृत्युवर वादग्रस्त पोस्ट, पत्रकारासह दोघे अटकेत

Next

इंफाळ - मणिपूरमध्ये एक पत्रकार आणि एका राजकीय कार्यकर्त्याला कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या भाजपा प्रदेशाध्यक्षांबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लिहिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पत्रकार किशोरचंद्र वांगखेम आणि राजकीय कार्यकर्ते एरेंड्रो लिचोम्बम यांना गुरुवारी रात्री घरातून अटक केली. (Controversial post on death of BJP state president, two arrested along with a journalist)

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष उषाम देबन आणि महासचिव पी. प्रेमानंद मितेई यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. दरम्यान स्थानिक न्यायालयाने या दोघांनाही १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनीही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सैखोम टिकेंद्र सिंह यांच्या मृत्यूवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. गोबर आणि गोमुत्र उपयुक्त ठरत नाहीत. 

दरम्यान, पत्रकार वांगखेम यांच्यावर याआधीही दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोनवेळा अटक झाली होती. दरम्यान, मणिपूरमधील भाजपाशासित सरकारने त्यांच्याविरोधात  राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत देशद्रोहाचा आरोप केला होता.

गेल्या आठवड्यात विषाणूपासून बचावासाठी काही लोक गाईचे शेण आपल्या शरीराला फासत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, गाईचे शेण कोरोनाविरोधात प्रभावी असल्याचा कुठलाही पुरावा मिळालेला नाही. गाईंचे रक्षण आणि त्यांचे कल्याण हे भाजपाच्या मुख्य अजेंड्यावर आहे

Web Title: Controversial post on death of BJP state president, two arrested along with a journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.