भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान ; ममतांनी साडी कोणती नेसावी हे प्रशांत किशोर ठरवणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 05:24 PM2019-06-09T17:24:29+5:302019-06-09T17:42:12+5:30
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत ममतांनी हालचाली सुरु केल्या आहेत.
कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवणुकीत आलेल्या अपयशानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रसिद्ध राजनीतीज्ञ प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. यावर प्रतिकिया देताना, भाजप नेते मुकुल रॉय यांनी वादग्रस्त विधान केले आहे. प्रशांत किशोर आता ममतांना कोणती साडी नेसावी, हे सांगणार का? असे विधान रॉय यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत ममतांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तर यासाठी राजनीतीज्ञ प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. यावर उत्तर देतांना, एके काळी ममता यांच्या मर्जीतील नेते मानले जाणारे आणि आता भाजपमध्ये असेलेल्या मुकुल रॉय यांनी ममतांबद्दल बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. बंगालमध्ये ममतांची लाट ओसरली आसून, त्यामुळे त्यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. ममतांनी साडी कोणती नेसावी, वेणी कशी घालावी आणि हात कसा हालवावा, हे आता प्रशांत किशोर ठरवतील, असे रॉय म्हणाले.
ममता आणि भाजपमधील वाद आणखीनच पेटताना दिसत आहे. ममतांनी भाजपला थेट आव्हान करत, केंद्रातील योजना राज्यात लागू करण्यासाठी विरोध केला होता. त्यातच भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांचे वाद थेट एकमेकांच्या जीव घेण्यापर्यंत गेला आहे. प्रशांत किशोर हे ममतांना मदतीसाठी आले असल्याने याचा किती फायदा ममतांना होणार हे आता पुढील काळच ठरवेल.