ममता सरकारमधील मंत्र्याचे वादग्रस्त विधान; केंद्रीय मंत्र्याला दिली दाढी-मिशा काढण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 21:09 IST2022-10-27T21:09:03+5:302022-10-27T21:09:15+5:30
भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अनेकदा एकमेकांवर टीका करतात.

ममता सरकारमधील मंत्र्याचे वादग्रस्त विधान; केंद्रीय मंत्र्याला दिली दाढी-मिशा काढण्याची धमकी
कोलकाता : ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री उदयन गुहा यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक यांची दाढी आणि मिशा कापून टाकण्याची धमकी दिली आहे. टीएमसीच्या सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला होता. निवडणूक जिंकल्यानंतर निशीथ प्रामाणिक कधीच परिसरात आले नाहीत. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते असे म्हणताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये उदयन गुहा म्हणतात की, जे नेते लोकांकडे दुर्लक्ष करतात, त्यांचा इलाज करणे गरजेचे आहे. पुढील निवडणुकीत टीएमसीच्या विजयानंतर त्यांची दाढी-मिशी कापली जाणार आहे. हा व्हिडिओ दिनहाटा येथील कुटी ग्रामपंचायत परिसरातील आहे. निसिथ प्रामाणिक तुमची कधीच पर्वा करणार नाही, असेही उदयन गुहा यांनी जनतेला म्हटले. आता पक्षाला पंचायत निवडणुकीत भरघोस बहुमताने जिंकण्यास मदत करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.