मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान, भाजपाची प्रवक्त्या नुपूर शर्मांवर मोठी कारवाई, सहा वर्षांसाठी केलं निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 04:56 PM2022-06-05T16:56:08+5:302022-06-05T16:56:47+5:30
Nupur Sharma News: भाजपा प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. नुपूर शर्मांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती
नवी दिल्ली - भाजपा प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. नुपूर शर्मांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, या वादापासून स्वत:ला बाजूला करण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी नुपूर शर्मांविरोधात कारवाई करताना त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केलं आहे. तसेच भाजपाने मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदल यांनाही निलंबित केलं आहे.
दरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानावरून सुरू झालेला विवाद शांत करण्यासाठी भाजपाने आपण सर्व धर्मांचा सन्मान करतो आणि कुठल्याही धर्मातील पूजनीय व्यक्तींचा अवमान हा खपवून घेतला जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.
एका टीव्ही चॅनलवरील डिबेटदरम्यान भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यामुळे मुस्लिम समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच नुपूर शर्मा यांच्यावर कारवाईची माहणी होत होती.