"मेक माय ट्रिप"च्या को-फाउंडरचं वादग्रस्त ट्विट

By admin | Published: June 3, 2017 01:15 PM2017-06-03T13:15:58+5:302017-06-03T13:22:11+5:30

मेक माय ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीच्या को-फाउंडरने बीफ बॅन संदर्भात वादग्रस्त ट्विट केलं आहे.

The controversial tweet of the co-founder of "Make My Trip" | "मेक माय ट्रिप"च्या को-फाउंडरचं वादग्रस्त ट्विट

"मेक माय ट्रिप"च्या को-फाउंडरचं वादग्रस्त ट्विट

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3- एखाद्या विषयावर वादग्रस्त ट्विट करण्याचा नवा ट्रेण्ड सध्या ट्विटरवर सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. राजकारणी, सेलिब्रेटींच्या वादग्रस्त ट्विट्सबद्दल गेल्या अनेक दिवसापासून ऐकतो आहे. आता यामध्ये आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. मेक माय ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीच्या को-फाउंडरने बीफ बॅन संदर्भात वादग्रस्त ट्विट केलं आहे.   मेक माय ट्रिपचे को-फाउंडर केयूर जोशी यांनी गोमांस बंदीबाबत आणलेल्या नव्या कायद्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. 
 
‘कोणी काय खायचं हे पंतप्रधान मोदी आणि भाजप ठरवू शकत नाही.’, मी मोदींचा कट्टर समर्थक आणि शुद्ध शाकाहारी आहे. पण आता खाण्याच्या स्वातंत्र्यासाठी मी बीफ खाणं सुरु करणार आहे.’ असं ट्वीट केयूरनं केलं आहे.
 
 
 
या वादग्रस्त ट्विटचा केयूर जोशी याला चांगलाच फटका बसायला सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर त्याच्याविरोधात बरीच टीका सुरु झाली आहे. त्याच्या या ट्वीटनंतर अनेक यूजर्स मेक माय ट्रिपचं अॅप आपल्या मोबाइलमधून डिलीट करत आहेत. तसंच त्याचं रेटिंगही कमी करत आहेत. हा #BoycottMakeMyTrip हॅशटॅग वापरुन केयूरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं आहे. यातील अनेकांनी आपल्या फोनमधील स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अॅप डिलीट करताना दिसत आहे.
 
 
 
 
 

Web Title: The controversial tweet of the co-founder of "Make My Trip"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.