आणखी एक मित्रपक्ष भाजपाची साथ सोडणार?; सरकार वाचवण्यासाठी BJP नं आखला प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 10:38 AM2023-06-09T10:38:56+5:302023-06-09T10:41:32+5:30

राज्यात भाजपा आणि जेजेपी यांच्यातील मतभेदामुळे २०२४ च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षात युती होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

Controversy between BJP and Jannayak Janata Party (JJP) in Haryana | आणखी एक मित्रपक्ष भाजपाची साथ सोडणार?; सरकार वाचवण्यासाठी BJP नं आखला प्लॅन

आणखी एक मित्रपक्ष भाजपाची साथ सोडणार?; सरकार वाचवण्यासाठी BJP नं आखला प्लॅन

googlenewsNext

नवी दिल्ली - भाजपा आणि त्यांचा सहकारी पक्ष जननायक जनता पार्टी(JJP) यांच्यात सध्या खटके उडत आहेत. सत्ताधारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील वाद जाहीरपणे चव्हाट्यावर येत असल्याने खट्टर सरकारवर टांगती तलवार आहे. त्याचवेळी हरियाणातील ४ अपक्ष आमदारांनी गुरुवारी भाजपा प्रभारी बिप्लब कुमार देब यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. अपक्ष आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे म्हटलं. 

देब यांनी म्हटलं की, आमचा पक्ष डबल इंजिन सरकारच्या धोरणावर पुढे जात आहे. राज्याच्या विकासाच्या कामावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही असं त्यांनी सांगितले. परंतु अलीकडेच सत्ताधारी भाजपा आणि जेजेपी यांच्यातील मतभेद दिसून येत आहेत. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी भाजपाबाबत विधान केले त्यावर भाजपाकडूनही प्रभारी बिप्लब देब यांनी पलटवार केला. 

उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले होते की, ना माझ्या पोटात दुखतंय ना मी डॉक्टर आहे. माझे काम पक्ष संघटना मजबूत करणे आहे. इतकेच नाही तर उत्तर प्रदेशातील माफिया अतीक अहमद आणि अशरफ यांच्या पोलीस कस्टडीतील हत्येबाबत प्रश्न उपस्थित केले. कायदा आणि सुव्यवस्थेवर त्यांनी शंका घेतली. पोलिसांच्या सुरक्षेत २ हत्या झाल्या त्याचा तपास व्हायला हवा. शेतकरी आंदोलनावेळीही चौटाला यांनी उघडपणे भाजपाविरोधात भूमिका घेतली. 

दुष्यंत चौटाला यांच्या विधानावर भाजपा प्रभारी बिप्लब देब यांनी निशाणा साधला, जर जेजेपीने आम्हाला समर्थन दिले ते उपकार नाहीत. त्याबदल्यात जेजेपीला मंत्रिपदे दिली आहेत. आता आमच्या युतीचे सरकार आहे. अपक्ष आमदारांनीही भाजपाला पाठिंबा दिला आहे. बिप्लब देब यांनी भाजपाच्या प्रेमलता यांना उचाना जागेवरून पुढील आमदार असल्याचे म्हटलं. तिथे सध्या उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे आमदार आहेत. भाजपा कार्यक्रमातही नेत्यांनी जेजेपीविरोधात मोर्चा उघडला. 

राज्यात भाजपा आणि जेजेपी यांच्यातील मतभेदामुळे २०२४ च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षात युती होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचसोबत चौटाला यांनीही भविष्यात काय होईल हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे. दोन्ही पक्ष ९० जागांसाठी तयारी करत आहेत. आम्ही १० जागांवर मर्यादित राहू शकत नाही. भाजपा केवळ ४० जागा लढवणार का? अजिबात नाही असं त्यांनी सांगितले. 

किती आहे संख्याबळ?
हरियाणात एकूण ९० जागा असून त्यात बहुमतासाठी ४६ चा आकडा हवा. सध्या भाजपाकडे ४१ आमदार आहेत. तर जेजेपी यांच्याकडे १० आमदारांचे पाठबळ आहे. जेजेपीने जर भाजपाचा पाठिंबा काढला तर अपक्ष आमदार भाजपासोबत राहतील त्यामुळे सरकारला तुर्तास धोका नाही. 

भाजपा - ४१
जेजेपी - १०
काँग्रेस - ३०
अपक्ष - ७ 
हरियाणा लोकहित पार्टी - १  

Web Title: Controversy between BJP and Jannayak Janata Party (JJP) in Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.