1200 किमी सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीचे वडील अडचणीत; होणार कायदेशीर कारवाई? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:37 PM2020-07-03T15:37:39+5:302020-07-03T15:38:15+5:30

ज्योतीने वडिलांना सायकलवर बसवून एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आठ दिवसात पूर्ण केले होते. ज्योतीने दररोज १०० ते १५० किमी सायकलिंग केले.

controversy with cycle girls jyoti; bhagirathi films accuses her father mohan paswan of breaking contract  | 1200 किमी सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीचे वडील अडचणीत; होणार कायदेशीर कारवाई? 

1200 किमी सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीचे वडील अडचणीत; होणार कायदेशीर कारवाई? 

Next

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात गुरुग्राम ते दरभंगा असा वडिलांना घेऊन 1200 किमी डबलसिट सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीच्या क्षमतेची दखल घेत भारतीय सायकलिंग महासंघाने (सीएफआय) तिला चाचणीची संधी देण्याचे ठरवले होते. पण, तिनं शिक्षण पूर्ण करण्याचे सांगून हा प्रस्ताव फेटाळला.  1200 किलोमीटर प्रवास करणाऱ्या या कन्येचं सर्वांनी कौतुक केलं. देशातच नव्हे, तर परदेशातही तिचं कौतुक केलं गेलं. पण, आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

PPE किट घालून डॉक्टरने केला भन्नाट डान्स; 5 लाखवेळा पाहिला गेला व्हिडीओ

ज्योतीने वडिलांना सायकलवर बसवून एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आठ दिवसात पूर्ण केले होते. ज्योतीने दररोज १०० ते १५० किमी सायकलिंग केले. तिच्या या प्रेरणादायी प्रवासावर चित्रपट तयार करण्याचा निर्धार विनोद कापडी यांच्या भगीरथी फिल्म्सनं केला. पण, त्याच काळात ज्योतीचे वडील मोहन पासवान यांना मुंबईतील एका वेब सारिज आणि डॉक्यूमेंट्री फिल्म निर्माण करणाऱ्या कंपनीनं लीगल नोटिस पाठवली आहे. ज्योतीच्या वडिलांनी करार मोडला आणि आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे कंपनीनं स्पष्ट केलं.

27 मे रोजी मोहन पासवान यांनी भगीरथी फिल्म्ससोबत चित्रपट बनवण्याचा करार केला. त्यासाठी त्याना कंपनीकडून 2 लाख 51 हजार रुपये देण्यात येण्याचे ठरले आणि त्यापैली 51 हजार कंपनीनं दिले. त्यानुसार करारही झाला. ज्योतीच्या प्रेरणादायी प्रवासावर चित्रपट बनवण्याचे हक्क विनोद कापडी यांना दिले होते. पण, आता भगीरथी फिल्म्सनं एक निवेदन जाहीर केलं आहे, त्यात त्यांनी मोहन पासवान यांनी शाईन कृष्णा या कंपनीसोबत करार केल्याचे म्हटले आहे. हे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


बाबो: 89 वर्षांचे वडील अन् 65 वर्षांची बहीण; फॉर्म्युला वनच्या माजी बॉसला पुत्ररत्न!

सुशांत सिंग राजपूतचा मित्र अन् दिग्गज बॉक्सरवर कोसळला दुःखाचा डोंगर!

Fact check: चीनला विरोध करणाऱ्या हाँगकाँगच्या आंदोलकांमध्ये खरंच दिसले का किम जोंग-उन?

ENGvsWI : इंग्लंड संघावर कोरोना संकट? खेळाडूची प्रकृती अचानक बिघडली, झाला सेल्फ आयसोलेट 

इरफान पठाणला 'पुढील हाफिज सईद' म्हणणाऱ्या पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा म्हणते...

पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप; वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पत्नीला लपवलं होतं कपाटात

 

Web Title: controversy with cycle girls jyoti; bhagirathi films accuses her father mohan paswan of breaking contract 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.