कर्नाटकात घमासान, उमेदवारी न दिल्याने माजी उपमुख्यमंत्र्यानी भाजप सोडला; हायव्होल्टेज सीट पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 01:06 PM2023-04-12T13:06:51+5:302023-04-12T13:23:26+5:30

भाजपाने ११ विद्यमान आमदारांना वगळले असून काँग्रेस आणि निजदच्या हायव्होल्टेज सात जागांवर देखील उमेदवार जाहीर केले आहेत. 

Controversy in Karnataka assembly election 2023, Former Chief Minister Laxman Savadi Quits Party After BJP Fails to Nominate Candidate; Check out the high voltage seat against congress | कर्नाटकात घमासान, उमेदवारी न दिल्याने माजी उपमुख्यमंत्र्यानी भाजप सोडला; हायव्होल्टेज सीट पहा...

कर्नाटकात घमासान, उमेदवारी न दिल्याने माजी उपमुख्यमंत्र्यानी भाजप सोडला; हायव्होल्टेज सीट पहा...

googlenewsNext

कर्नाटकातून भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याचबरोबर भाजपात राजीनामा पडला असून अथनीतून माजी उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. याचबरोबर भाजपाने ११ विद्यमान आमदारांना वगळले असून काँग्रेस आणि निजदच्या हायव्होल्टेज सात जागांवर देखील उमेदवार जाहीर केले आहेत. 

काँग्रेसमध्ये चाणक्य डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी य़ांच्यासह सात जागा या देशाचे लक्ष वेधून घेणार आहेत. भाजपानेही त्यांच्याविरोधात ताकदवर नेत्यांना उतरविले आहे. 

सिद्धरामय्यांच्या विरोधात भाजपाने वरुणा मतदारसंघातून ज्येष्ठ मंत्री व्ही सोमन्ना यांना तिकीट दिले आहे. सोमन्ना हे लिंगायत समाजातून असून ते चामराजनगरमधून देखील निवडणूक लढविणार आहेत. 

डी के शिवकुमार यांच्याविरोधात कनकपुरा सीटवर भाजपाने आर अशोका यांना तिकीट दिले आहे. ते वक्कलिग समाजाचे आहेत. अओका देखील कर्नाटक सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनाही भाजपाने पद्मनाभ नगरमधून दुसरे तिकीट दिले आहे. 

कुमारस्वामी यांच्याविरोधात भाजपाने चन्नापटना सीटवरून मंत्री सीपी योगेश्वर यांना तिकीट दिले आहे.  तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक विरोधात चितापूर सीटवर भाजपाने मणिकांता राठोड यांना तिकीट दिले आहे. 

काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या विरोधात भाजपाने कोरातागेरे सीटवरून माजी आयएएस अधिकारी अनिल कुमार यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री एच मुनियप्पा यांच्याविरोधात भाजपाने देवनहळ्ळीमधून आमदार पिला मुनीशमप्पा यांना तिकीट दिले आहे. चारवेळा काँग्रेसचे आमदार असलेल्या यू टी खादर यांच्या दक्षिण कन्नड़मध्ये भाजपाने मंगळुरुच्या सतीश कुमापला यांना मैदानात उतरले आहे. 

Web Title: Controversy in Karnataka assembly election 2023, Former Chief Minister Laxman Savadi Quits Party After BJP Fails to Nominate Candidate; Check out the high voltage seat against congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.