लोकसभेमध्ये भाजपा खासदार रमेश बिधूडी यांच्या विधानावरून वाद, अध्यक्षांनी दिली ताकीद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 02:40 PM2023-09-22T14:40:14+5:302023-09-22T14:40:49+5:30
Ramesh Bidhuri: लोकसभेमध्ये भाजपा खासदार रमेश बिधूडी यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसपासून तृणमूल काँग्रेसपर्यंत सर्व पक्षांनी भाजपावर टीका केली आहे.
लोकसभेमध्ये भाजपा खासदार रमेश बिधूडी यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसपासून तृणमूल काँग्रेसपर्यंत सर्व पक्षांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच लोकसभा अध्यक्षांकडे रमेश बिधूडी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाद वाढल्यानंतर रमेश बिधूडी यांच्या वक्तव्यातील वादग्रस्त भाग सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आला आहे.
भाजपा खासदार रमेश बिधूडी संसदेच्या विशेष अधिवेशनातील चौथ्या दिवशी लोकसभेमध्ये चंद्रयान-३ च्या यशावर बोलत होते. तेव्हा खासदार दानिश अली यांनी काही टिप्पणी केली होती. त्यावर रमेश बिधूडी संतप्त झाले. तसेच त्यांनी लोकसभेमध्ये दानिश अली यांच्याविरोधात वादग्रस्त शब्दांचा वापर केला. मात्र आता लोकसभेच्या कामकाजातून त्यांच्या वक्तव्यातील वादग्रस्त भाग हटवण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश बिधूडी यांच्याशी लोकसभा अध्यक्षांनी चर्चा केली आहे. त्यांनी रमेश बिधूडी यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रमेश बिधूडी यांना इशारा दिला आहे. तसेच भाषेच्या मर्यादेवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपा खासदार रमेश बिधूडू यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत लोकसभेमध्ये माफी मागितली आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, त्यांनी टिप्पणी ऐकली नाही. त्यांनी लोकसभा अध्यक्षांना आवाहन केले की, या वक्तव्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते शब्द कामकाजातून हटवण्यात यावे.