उल्हास पाटील रुग्णालयात शासकीय कर्मचार्यांची सोय
By Admin | Published: March 14, 2016 12:22 AM2016-03-14T00:22:02+5:302016-03-14T00:22:02+5:30
जळगाव : शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आजारावरील उपचाराच्या खर्चाच्या परताव्यासाठी राज्य शासनाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता दिली असल्याचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे.
ज गाव : शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आजारावरील उपचाराच्या खर्चाच्या परताव्यासाठी राज्य शासनाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता दिली असल्याचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे.शासनाकडून हृदयाच्या शस्त्रक्रिया, ॲन्जीओप्लास्टी, कर्करोग यासह गंभीर आजारांच्या उपचारासाठी शासकीय कर्मचार्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती (परतावा) केली जाते. यासाठी काही खाजगी रुग्णालये शासनाने संलग्नित केले आहे. यात आता गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ व त्या अनुषंगाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयास राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांसाठी हृदय शस्त्रक्रिया, ॲन्जीओग्राफी, ॲन्जीओप्लास्टी, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्याकरीता होणारा वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती (परतावा) करण्याला मान्यता दिली आहे. तसे आदेश डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयास प्राप्त झाले आहे. खान्देशातील रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने केला आहे.