मदर तेरेसांच्या ‘सेवे’मागे धर्मांतर हाच अंतस्थ हेतू
By admin | Published: February 24, 2015 04:34 AM2015-02-24T04:34:17+5:302015-02-24T04:34:17+5:30
गरीब आणि रुग्णांची सेवा करण्यामागे मदर तेरेसा यांचा मुख्य अंतस्थ हेतू त्यांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणे हाच होता, असे विधान करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोनवारी एका नव्या वादाला तोंड फोडले.
भरतपूर: गरीब आणि रुग्णांची सेवा करण्यामागे मदर तेरेसा यांचा मुख्य अंतस्थ हेतू त्यांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणे हाच होता, असे विधान करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोनवारी एका नव्या वादाला तोंड फोडले.
येथून आठ किमी अंतरावर असलेल्या भजेरा गावात ‘अपना घर’ या स्वयंसेवी संस्थेने निराधार महिलांसाठी बांधलेल्या ‘महिला सदन’ आणि ‘शिशू सदन’चे उदघाटन करताना भागवत यांनी हे वादग्रस्त विधान केले. गोरगरीब आणि निराश्रीतांच्या निस्पृह सेवेबद्दल नोबेल पुरस्काराने गौरविलेल्या मदर तेरेसा यांचे सप्टेंबर १९९७ मध्ये कोलकाता येथे निधन झाल्यानंतर १८ वर्षांनी भागवत यांनी त्यांच्या हेतूबद्दल अशी जाहीरपणे शंका घेतली.
मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज आॅफ चॅरिटिज’च्या जयपूरमधील मुख्य सिस्टरने भागवत यांच्या यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)