पतीच्या मृत्यूनंतर लग्नात जेवण बनवून कमावलं, मुलीला शिकवलं; 10 वर्षांनी लेक झाली CID ऑफिसर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 03:02 PM2023-02-03T15:02:37+5:302023-02-03T15:15:02+5:30

मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची कमतरता भासू नये म्हणून लग्नसमारंभातही जेवण बनवले.

cooking in weddings after husband death daughter became cid officer after 10 years | पतीच्या मृत्यूनंतर लग्नात जेवण बनवून कमावलं, मुलीला शिकवलं; 10 वर्षांनी लेक झाली CID ऑफिसर

फोटो - झी न्यूज

googlenewsNext

सिमरजीत कौर य़ा मुलीची सीआयडी आयबी आणि जयपूर आयुक्तालयात निवड झाली आहे. तिचा हा प्रवास संघर्षमय होता. दहा वर्षांपूर्वी शार्दुल सिंह यांच्या निधनानंतर तीन मुलांची आई असलेल्या मनजीत कौर यांच्यावर उपजीविकेचे संकट आले. मनजीत कौर या सिमरजीतची आई आहेत. त्यांनी लेकीच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले आणि मुलीने देखील आता त्यांच्या कष्टाचं सोनं केलं आहे. मुलांच्या भवितव्यासाठी कठोर परिश्रम केले. 

मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची कमतरता भासू नये म्हणून लग्नसमारंभातही जेवण बनवले. मनजीत कौर यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर लोकांच्या घरी आणि लग्नसोहळ्यात जेवण बनवण्याचे काम तसेच मुलांचे संगोपन करण्याचे काम केले. आता आपल्या मुलीच्या यशाने मनजीत कौरच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी मोठ्या कष्टाने मुलांचे संगोपन केल्याचे सांगितले.

मनजीत कौर लग्नसमारंभात बनवायच्या जेवण 

सिमरजीत कौर यांनी सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर त्यांचे आयुष्य खूप कष्टात गेले. लोकांच्या घरी जेवण बनवण्याचं काम करून आईनं तिला इथपर्यंत नेलं. आपल्या यशाचे श्रेय आई मनजीत कौर आणि धाकटी बहीण राजपाल कौर यांना दिले. आईने मुलीच्या शिक्षणासाठी लोकांच्या घरी काम करून मुलांचे संगोपन केले. लोक टोमणे मारायचे पण मुलगी शिकून अधिकारी झाली आहे. 

लोक कुटुंबाला अनेकदा मारले टोमणे 

सिमरजीतचे प्राथमिक शिक्षण सिलवाला कलान येथे झाले आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण तलवाडा तलावाच्या सरकारी शाळेत झाले. सिमरजीतने टिब्बीच्या कासवान गर्ल्स पीजी कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. सिमरजीत कौर यांनी सांगितले की, मुलींच्या शिक्षणाकडे लोकांचा विचार सकारात्मक नाही. आपल्या मुलींना शिक्षण देऊन अधिकारी करणार म्हणून लोक त्यांच्या कुटुंबाला अनेकदा टोमणे मारायचे. मुलींना लग्न करून इतर घरी पाठवावे लागते, पण आईच्या जिद्दीमुळे मुलगी आता अधिकारी झाली आहे. 

"मुलींवर विश्वास ठेवला पाहिजे"

लोकांनी मुलींबद्दलचा विचार बदलला पाहिजे. मुली अभ्यास करू शकतात, पुढे जाऊ शकतात. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता पालकांनी संधी दिली पाहिजे. मुलींवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना शिकवले पाहिजे, जेणेकरून त्यांनीही माझ्यासारखे पुढे जावे. मुलींना विशेष वेळ द्या. आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करणे हेच जीवनाचे ध्येय होते आणि ते मी पूर्ण केले आहे असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: cooking in weddings after husband death daughter became cid officer after 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.