मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अॅप लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 01:12 PM2020-08-20T13:12:56+5:302020-08-20T13:25:35+5:30
झोमॅटो, डुंजोसारख्या अनेक कंपन्यांनी यावर 20 लाखांहून अधिक नोकऱ्या पोस्ट केल्या आहेत.
आपल्याला इंटरनेटवर काही जरी शोधायचे झाले तरीही गुगलशिवाय सध्यातरी पर्याय नाहीय. कोणतीही वस्तू असेल की फोटो किंवा नोकरी तुम्हाला गुगलच त्या त्या संबंधित वेबसाईटची लिंक पुढ्यात आणून ठेवते. परंतू आता गुगल तुमची जॉब कन्सल्टन्सी होणार आहे. होय काहीसे असेच अॅप गुगलने भारतात लाँच केले आहे. ज्यावर कंपन्यांमध्ये असलेल्या नोकऱ्या थेट कळणार आहेत.
Google Kormo App for Jobs Search in India: गुगलने कॉर्मो नावाचे अॅप लाँच केले आहे. हे असे अॅप आहे जे भारतातील करोडो बेरोजगारांना मदतगार ठरणार आहे. हे अॅप एन्ट्रीलेव्हल जॉब शोधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
टेक क्रंचअनुसार गुगलने कॉर्मो जॉब्स (Kormo Jobs) हे अॅप पेमेंट सोल्यूशन गुगल पे (Google Pay) मध्ये जॉब स्पॉटमध्ये जोडले आहे. भारतात हे अॅप जॉब स्पॉटच्या नावाने प्रसिद्ध केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे गुगलने हे अॅप भारताचा छोटा शेजारी बांग्लादेशमध्ये 2018 मध्ये लाँच केले होते. यानंतर इंडोनेशियामध्येही लाँच केले होते. आता हे अॅप भारतात आणण्यात आले आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार हे अॅप गुगल पेद्वारे उपलब्ध असून झोमॅटो, डुंजोसारख्या अनेक कंपन्यांनी यावर 20 लाखांहून अधिक नोकऱ्या पोस्ट केल्या आहेत.
हे अॅप केवळ नोकरीच शोधण्यासाठी उपयुक्त नाहीय तर रिझ्युम, सीव्ही बनविण्यासाठीची कौशल्य़ेही आत्मसात करण्यासाठी मार्गर्शक ठरणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले
लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले
'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले
पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले
एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब
मुकेश अंबानी आता औषधे ऑनलाईन पुरविणार; Amazon ला धोबीपछाड, Netmeds खिशात
Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर
जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता
पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न