Video : धावत्या ट्रेनखाली आलेल्या प्रवाशाचे आरपीएफ जवानाने 'असे' वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:43 PM2018-11-14T12:43:44+5:302018-11-14T12:48:14+5:30
तामिळनाडूतील एगमोर रेल्वे स्टेशनवर अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. धावती ट्रेन पकडताना एका प्रवाशाचा तोल गेला. त्यामुळे प्रवासी रेल्वेखाली आला मात्र त्याचवेळी आरपीएफ जवानाने प्रसंगावधान राखून या प्रवाशाचे प्राण वाचवले.
चेन्नई - धावती ट्रेन पकडणे हे अत्यंत धोकादायक आहे अशी सूचना रेल्वे स्टेशनवर वारंवार प्रवाशांना दिली जाते. मात्र तरीही ट्रेन पकडताना होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ होतानाच दिसत आहे. तामिळनाडूतील एगमोर रेल्वे स्टेशनवर अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. धावती ट्रेन पकडताना एका प्रवाशाचा तोल गेला. त्यामुळे प्रवासी रेल्वेखाली आला मात्र त्याचवेळी आरपीएफ जवानाने प्रसंगावधान राखून या प्रवाशाचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
एगमोर रेल्वे स्टेशनवर एक प्रवासी धावती ट्रेन पकडण्याच्या नादात रेल्वेखाली आला. रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या आरपीएफला ती व्यक्ती गाडीच्या खाली जात असल्याचे दिसले. त्याने तात्काळ धाव घेतली आणि रेल्वेसोबत फरफटत खाली जात असलेल्या प्रवाशाला खेचून बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने प्रवाशाचा जीव वाचला आहे. याआधीही धावती ट्रेन पकडताना प्रवाशाचा तोल जाऊन अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
#WATCH: Railway Protection Force (RPF) personnel saved a passenger's life by rescuing him from falling, while he was boarding a train at Egmore Railway Station's platform. The passenger didn't suffer any injury. #TamilNadu (12.11.18) pic.twitter.com/OdNDYMdu2y
— ANI (@ANI) November 14, 2018