खुल्लोड येथे कुस्त्यांचा सामना
By Admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:07+5:302015-02-14T23:52:07+5:30
उंडणगाव : खुल्लोड (ता. सिल्लोड) येथील खोलेश्वर महादेव मंदिराजवळ महाशिवरात्री यात्रा उत्सवात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
प णे : मागील वर्षभरापासून विविध कारणांमुळे बहुतेक सर्वच डाळींच्या भावाने उसळी घेतली आहे. क्लिंटलमागे ८०० ते २३०० रुपयांपर्यंत भाव कडाडले आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. वर्षभरात तुरडाळीच्या भावात सर्वाधिक २००० ते २३०० रुपयांपर्यंत वाढ झाली असून उडीद डाळीच्या भावातही १९०० ते २२०० रुपयांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली.पुण्यातील गुलटेकडी भुसार बाजारातील डाळींच्या गेल्या वर्षभरातील भावांचा आढावा घेतला. त्यावरून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून डाळींच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. जुलै २०१४ नंतर डाळींच्या भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. यंदा मान्सुनने ओढ दिल्याने खरीप हंगाम उशीरा सुरू झाला. परिणामी देशांतर्गत डाळींच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे स्थानिक बाजारातील डाळींचे भाव वाढण्यास सुरूवात झाली. एकुण देशांतर्गत गरजेपैकी सुमारे ५० ते ६० टक्के डाळींची आयात केली जाते. लागवड कमी झाल्याने देशातील डाळींचे उत्पादन घटले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलचे भाव वधारले. त्याचाही परिणाम डाळींच्या भावावर झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी व पुरवठ्यातील तफावतही भाव वाढण्यास कारणीभुत ठरली. तुरडाळ व उडीदडाळीला त्याचा सर्वाधिक फटका बसला.भुसार बाजारात मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात तुरडाळीचे प्रति क्विंटलचे भाव ५५०० ते ६३०० रुपये एवढे होते. वर्षभरात हे भाव ७५०० ते ८६०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. म्हणजे वर्षातच भावात २००० ते २३०० रुपयांनी वाढ झाली आहे. उडीदडाळीचे भावही १९०० ते २२०० रुपयांनी, हरभरा डाळीचे भाव सुमारे ८०० रुपयांनी, मुग डाळीचे भाव सुमारे १५०० रुपयांनी, मसुर डाळीचे भाव सुमारे १७०० रुपयांनी तर मटकी डाळीचे भाव सुमारे १४०० रुपयांनी वाढले आहेत. वर्षभरात डाळींचे भाव काही अपवाद वगळता सातत्याने चढेच राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सामान्य नागरिकांना घाऊक बाजारातील भावापेक्षा किरकोळ बाजारात सरासरी किलोमागे ५ ते १५ रुपये अधिक मोजावे लागतात. त्यामुळे ग्राहकांना डाळींच्या भाववाढीचा चांगलाच फटका बसत आहे.----------चौकटमागील वर्षभरातील डाळींचे घाऊक बाजारातील भाव (क्विंटलमागे)दिनांकतुरडाळ उडीद डाळहरभरा डाळमुग डाळ मसुर डाळमटकी डाळ१३ जुलै १४५७००-६६००७३००-७७००३३००-४०००८२००-९०००६२००-६३००७८००-८०००१२ ऑक्टो.१४६५००-७५००६६००-७०००३७००-४३००८५००-९२००६८००-६९००८०००-८२००२३ नोव्हें.१४७०००-७८००७०००-७५००३८००-४४००९०००-१०,५००७१००-७३००८२००-८५००१४ डिसें.१४६८००-७५००७३००-८०००३७००-४२००९५००-१०,५००७२००-७३००८०००-८५००११ जाने.१५७१००-८१००८०००-८५००४२००-४८००९५००-१०,७००७५००-७६००८५००-८८००१४ फेब्रु.१५७५००-८६००७७००-८२००४३००-४८००९५००-१०,५००७०००-७२००८५००-८६००------------------------