पोलिसाची मुलगी बनली गुंडांची 'गॉड मदर', अतिक अहमदच्या पत्नीच्या शोधासाठी पथके रवाना...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 01:38 PM2023-04-19T13:38:19+5:302023-04-19T13:38:52+5:30

माफिया अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन फरार आहे. शाइस्तावर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Cop's daughter becomes gangster's 'godmother', teams sent to search for Atiq Ahmed's wife... | पोलिसाची मुलगी बनली गुंडांची 'गॉड मदर', अतिक अहमदच्या पत्नीच्या शोधासाठी पथके रवाना...

पोलिसाची मुलगी बनली गुंडांची 'गॉड मदर', अतिक अहमदच्या पत्नीच्या शोधासाठी पथके रवाना...

googlenewsNext


प्रयागराज: 15 एप्रिलच्या रात्री पोलिसांच्या सुरक्षेत असलेल्या अतिक अहमद आणि अशरफ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता त्याची 51 वर्षीय पत्नी शाइस्ता परवीन यूपी पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत आली आहे. अतिकच्या फरार पत्नीबद्दल माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे. अवघ्या दोन दिवसांत शाइस्ताने मुलगा असद आणि पती अतिक यांना गमावले, त्यामुळे ती पुढे काय करणार, याकडेच पोलिसांचे लक्ष आहे. शाइस्ता परवीन अतिकची पत्नी आणि आता मोस्ट वॉन्टेड कशी बनवली, जाणून घेऊ...

शाइस्ता परवीनचे वडील पोलीस खात्यात होते. 1996 मध्ये अतिक अहमदशी लग्न करण्यापूर्वी शाइस्ताचे जग पूर्णपणे वेगळे होते. अतिकची पत्नी होण्यापूर्वी तिचा कोणत्याही अवैध कामांशी संबंध नव्हता. सध्या तिच्या नावावर प्रयागराजमध्ये 4 गुन्हे दाखल आहेत. यातील 3 फसवणूक आणि 1 खुनाचा. 2009 मध्ये कर्नलगंज पोलिस ठाण्यात पहिले 3 गुन्हे दाखल झाले होते. उमेश पाल खून प्रकरणानंतर खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शाइस्ता उमेश पाल हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. 

पोलीस अहवालानुसार, शाइस्ता परवीन ही उमेश पालच्या हत्या प्रकरणात योजना आखणे आणि अमलात आणण्यात सामील होती. अतिक अहमद तुरुंगात असताना शाइस्तानेच त्याची गँग चालवण्यात सक्रिय भूमिका बजावली होती. शाईस्ता परवीन या टोळीतील 'गॉड मदर' म्हणून ओळखली जायची. अतिकचा नातेवाईक मोहम्मद झीशान याने पोलिसात एफआयआर दाखल केली होती. एफआयआरनुसार, अतिकने त्याचा मुलगा अली याला 25 बंदूकधारी व्यक्तींसह झीशानकडे पाठवले आणि त्याची जमीन शाइस्ताच्या नावावर करण्यास सांगितले. याशिवाय, 5 कोटी रुपयांची खंडणीही मागितली. सध्या पोलीस शाइस्ता परवीनच्या शोधात आहेत. तिच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. 

Web Title: Cop's daughter becomes gangster's 'godmother', teams sent to search for Atiq Ahmed's wife...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.