बिग बींच्या आवाजातील काेराेना काॅलरट्यून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 05:47 AM2021-01-16T05:47:40+5:302021-01-16T05:48:04+5:30

भारताने उचलली योग्य पावले; आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

coroan callertune off Big B's voice | बिग बींच्या आवाजातील काेराेना काॅलरट्यून बंद

बिग बींच्या आवाजातील काेराेना काॅलरट्यून बंद

Next

काेराेनापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला बिग बी अमिताभ बच्चन हे प्रत्येक माेबाइल काॅलरला देत असतात. त्यांच्या आवाजामध्ये तशी काॅलरट्यून रेकाॅर्ड करण्यात आली आहे; मात्र आता ही ट्यून बदलण्यात येणार आहे. नव्या काॅलरट्यूनमध्ये बच्चन यांचा आवाज नसेल. नवी काॅलरट्यून लसीकरणावर भर देणारी राहणार असून, लवकरच ती ऐकायला मिळेल.

भारताने उचलली योग्य पावले; आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

वॉशिंग्टन : कोरोना साथीची स्थिती व त्यामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट यांचा मुकाबला करण्यासाठी भारताने ठोस व योग्य पावले उचलली आहेत, अशी प्रशंसा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्तलिना जॉर्जिएन्व्हा यांनी केली. यंदाच्या वर्षी भारताने अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी आणखी पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले. क्रिस्तलिना जॉर्जिएव्हा म्हणाल्या की, कोरोना साथीच्या काळात भारताने ज्या पद्धतीने निर्णय घेतले त्यामुळे त्यांना भविष्यात मोठे आर्थिक संकट जाणवण्याची शक्यता नाही. जगातील आर्थिक स्थितीसंदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आपला अहवाल २६ जानेवारी रोजी प्रसिद्ध करणार आहे. भारतामध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी करणे हा एक धाडसी निर्णय होता. त्यानंतर भारताने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिलही केले. 

Web Title: coroan callertune off Big B's voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.