Coromandel Express Accident: LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 02:17 PM2023-06-04T14:17:16+5:302023-06-04T15:08:18+5:30

ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनच्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना क्लेम मिळवण्याची प्रक्रिया सोपी केली आहे.

Coromandel Express Accident: Big decision by LIC; Immediate claim for relatives of Odisha train accident victims | Coromandel Express Accident: LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

Coromandel Express Accident: LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

googlenewsNext

Coromandel Express Accident: देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन दुर्घटनेतील बळी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने मोठे पाऊल उचलले आहे. एलआयसीने या अपघातातील पीडितांसाठी विमा पॉलिसीचा दावा(क्लेम) करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे.

एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी शनिवारी एक निवेदन जारी केले. यामध्ये एलआयसीने क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत रेल्वे अपघातातील पीडितांना विविध प्रकारची मदत जाहीर केली आहे.

पॉलिसीचा दावा करणे सोपे 
एलआयसीच्या निवेदनानुसार, रेल्वे अपघातातील पीडितांना जास्त अडचणी येऊ नयेत, म्हणून त्यांच्या एलआयसीच्या विमा पॉलिसी, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पॉलिसी आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पॉलिसीची दावा प्रक्रिया सुलभ केली जात आहे.

आता रेल्वे, पोलीस, कोणतेही राज्य सरकार आणि कोणत्याही केंद्रीय विभागाने जारी केलेली मृतांची यादी अपघातग्रस्तांच्या विम्याचा दावा करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र मानली जाईल. म्हणजेच, या मृतांच्या नातेवाईकांना विम्याचा दावा करण्यासाठी नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागणार नाही.

एलआयसीने विशेष हेल्प डेस्क सुरू केला
इतकंच नाही तर कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी एलआयसीने विशेष हेल्प डेस्क आणि कॉल सेंटर सुरू केले आहे. LIC च्या विभागीय आणि शाखा स्तरावरील कार्यालयात दाव्याशी संबंधित चौकशीचे निराकरण केले जाईल. त्याचबरोबर दाव्यासाठी अर्ज करणाऱ्या नातेवाइकांना पूर्ण मदत केली जाईल. एवढेच नाही तर सर्व विमाधारकांपर्यंत पोहोचून क्लेम सेटलमेंट जलद करण्याचा प्रयत्न केला जाईल.

अपघातात 285+ ठार, 1,100 जखमी
एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या अपघातात 285+ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सुमारे 1,100 लोक जखमी झाले आहेत. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला.

Web Title: Coromandel Express Accident: Big decision by LIC; Immediate claim for relatives of Odisha train accident victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.