कोरोना ठरतोय किडनीचा काळ, जाणून घ्या काय आढळलंय संशोधनात?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 10:35 AM2021-09-09T10:35:29+5:302021-09-09T10:36:17+5:30
३५ टक्के लोकांना दीर्घकाळपर्यंत त्रास
कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना त्यानंतरच्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे. बहुतेकांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच आता कोरोना दीर्घकाळ राहिला तर त्याचा दुष्परिणाम किडनीच्या कार्यावर होतो, असे संशोधनात आढळून आले आहे.
काय आढळले संशोधनात?
nअमेरिकेतील मिसुरी राज्यातील सेंट लुई हेल्थकेअर सिस्टीम या संस्थेच्या चमूने कोरोनोत्तर परिणामांचे संशोधन केले.
nकोरोनातून बरे झालेल्या ८९ हजार
लोकांच्या डेटाचा अभ्यास त्यांनी केला.
nकोरोनामुक्त झालेल्या लोकांना त्यानंतरच्या पहिल्या महिन्यात काय व्याधी जाणवल्या या मुद्द्यावर अभ्यासाचा भर होता.
nकोरोनामुक्त झालेल्या लोकांपैकी ३५ टक्के लोकांना दीर्घकाळपर्यंत किडनीचा त्रास संभवतो, असे या अभ्यासात निदर्शनास आले.
काय परिणाम होतो किडनीवर
nकोरोनामुळे किडनीच्या
कार्यावर परिणाम होतो.
nपरिणाम बळावले तर किडनीचे कार्य थांबण्याचा धोकाही असतो.
nकोरोनामुक्त झालेल्यांनी
निदान सहा महिन्यांपर्यंत
नियमितपणे वैद्यकीय तपासण्या करून घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
nरक्त शद्ध करणे हे किडनीचे
मुख्य कार्य आहे.
कोणावर अधिक परिणाम?
कोरोनाकाळात ज्यांना दीर्घकाळपर्यंत रुग्णालयात दाखल व्हावे लागले
त्यांना सर्वाधिक धोका आहे.
ज्यांना कोरोनाचा मध्यम स्वरूपाचा संसर्ग झाला होता त्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे आढळलेल्यांमध्ये किडनीवर परिणाम झाले नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.