Corona Cases in India: कोरोनाने पकडला वेग, एका आठवड्यात रुग्णसंख्या दुप्पट; 12 राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 10:50 AM2022-04-25T10:50:50+5:302022-04-25T10:51:04+5:30

Corona Cases in India: कोरोना व्हायरसने पुन्हा वेग धरल्याचे दिसत आहे.18 ते 24 एप्रिल दरम्यान रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.

Corona Cases in India: Corona catches speed, doubles number of patients in one week; Most patients in 12 states | Corona Cases in India: कोरोनाने पकडला वेग, एका आठवड्यात रुग्णसंख्या दुप्पट; 12 राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण

Corona Cases in India: कोरोनाने पकडला वेग, एका आठवड्यात रुग्णसंख्या दुप्पट; 12 राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण

Next

Corona Cases in India: कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. देशात अशी 12 राज्ये आहेत जिथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांचाही समावेश आहे. सध्या भारतात संसर्गाचे प्रमाण 0.84 टक्के आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 16 हजार 522 वर गेली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आकडेवारीनुसार, 18 ते 24 एप्रिल दरम्यान 15,700 नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर त्या आधीच्या आठवड्यात 8050 रुग्ण आढळले होते. ही 95 टक्क्यांची वाढ चिंतेचा विषय बनली आहे. हा दुसरा आठवडा आहे जेव्हा कोरोनाचे नवीन रुग्ण वाढले आहेत. यापूर्वी 11 आठवड्यांपर्यंत कोरोना प्रकरणांमध्ये घट झाली होती. कोरोना प्रकरणांमध्ये या वाढीचे कारण ओमायक्रॉन सब-व्हेरियंट आहे की आणखी काही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चांगली बाब म्हणजे, मृतांच्या संख्येत वाढ झालेली नाही.

12 राज्यांमध्ये रुग्णवाढ
आतापर्यंत फक्त दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णसंख्या वाढत होती. पण, गेल्या आठवड्यात इतर 9 राज्यांमध्ये चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, बंगाल, राजस्थान, पंजाब, तेलंगणा, मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात 48 टक्के, कर्नाटकात 71 टक्के, तामिळनाडूमध्ये 62 टक्के, बंगालमध्ये 66 टक्के, तेलंगणामध्ये 24 टक्के आणि राजस्थानमध्ये 57 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

Web Title: Corona Cases in India: Corona catches speed, doubles number of patients in one week; Most patients in 12 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.