Corona Cases India: महाराष्ट्र-दिल्लीसह 'या' राज्यांना केंद्राचे पत्र, वाढत्या कोरोना रुग्णांवर नजर ठेवण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 09:23 PM2022-04-08T21:23:30+5:302022-04-08T21:23:45+5:30
Corona Cases India: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवड्यात वाढलेल्या रुग्णांवर नजर ठेवण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम यांना पत्र लिहून गेल्या आठवड्यात वाढलेल्या कोरोना प्रकरणांवर कडक नजर ठेवण्यास सांगितले आहे. तसेच, गरज भासल्यास आधीप्रमाणे आवश्यक कारवाईही करता येईल, असे म्हटले आहे.
Union Health Secretary Rajesh Bhushan writes to Delhi, Haryana, Kerala, Maharashtra and Mizoram over the increase in Covid19 cases in the respective states the last week, asking them to maintain a strict watch and take pre-emptive action if required.
— ANI (@ANI) April 8, 2022
गेल्या चोवीस तासात देशात आणखी 1,109 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळल्यानंतर, एकूण संसर्गाची संख्या 4,30,33,067 वर पोहोचली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या 11,492 वर आली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 43 रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या 5,21,573 झाली आहे.
आकडेवारीनुसार, देशात मृत्यू झालेल्या 43 रुग्णांपैकी 36 लोक केरळमधील आहेत. महामारीमुळे आतापर्यंत 5,21,573 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी महाराष्ट्रात 1,47,806, केरळमध्ये 68,264, कर्नाटकात 40,056, तामिळनाडूमध्ये 38,025, दिल्लीत 26,155, उत्तर प्रदेशात 23,498 आणि पश्चिम बंगालमध्ये 20,208 लोकांचा मृत्यू झाला आहेत.