Coronavirus : मे महिन्याच्या अखेरिस भारत १.४ कोटींची संख्या पार करण्याची शक्यता; संशोधनातून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 07:50 AM2021-04-04T07:50:54+5:302021-04-04T07:54:59+5:30

कोरोनाची दुसरी लाट देशात झपाट्यानं वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद

corona cases may cross 1 4 million mark by the end of may says iisc Bengaluru research | Coronavirus : मे महिन्याच्या अखेरिस भारत १.४ कोटींची संख्या पार करण्याची शक्यता; संशोधनातून दावा

Coronavirus : मे महिन्याच्या अखेरिस भारत १.४ कोटींची संख्या पार करण्याची शक्यता; संशोधनातून दावा

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाची दुसरी लाट देशात झपाट्यानं वाढत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद

गेल्या काही दिवसांपासू देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. दरम्यान, जर हीच परिस्थिती कायम राहिली तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या १.४ कोटींवर जाईल असा अंदाज झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान बंगळुरू येथील इंडियन इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सनं (IISC) वर्तवला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या मध्यावधीत कोरोना विषाणूचा पीक असू शकतो आणि यावेळी उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या ७.३ लाखांवर जाऊ शकते. तसंच या संशोधनानुसार अधिक बिकट परिस्थितीत मे महिन्याच्या अखेरिस उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या २० लाखांपर्यंतही पोहोचू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु जर लोकांचं लसीकरण केलं आणि कोरोना नियमांचं पालन केलं तर याला आळा घातला जाऊ शकतो, असंही यात वर्तवण्यात आलं आहे. 

IISC चे प्राध्यापक शशिकुमार आणि दीपक यांचा हा अंदाज कोरोनाच्या सध्याच्या ट्रेंडवर अवलंबून आहे. या अंदाजानुसार केवळ कर्नाटकातच एप्रिल अखेरपर्यंत या केसेसची संख्या १०.७ लाखांपर्यंत पोहोचू शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार वेगानं होताना दिसत आगे. तसंच आदल्या दिवसाच्या तुलनेत त्याच्या दुसऱ्या दिवशी जवळपास ९ हजार अधिक केसेस नोंदवल्या जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार शनिवारी २४ तासांमध्ये देशात ८९,१२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर दुसरीकडे ७१४ जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत एकूण १ कोटी २३ लाखांच्यावर रुग्णांची नोंद झाली आहे. तर शनिवारपर्यंत देशात १ लाख ६४ हजारांच्यावर मृत्यू आणि ६ लाख ५८ हजारांच्यावर अॅक्टिव्ह केसेसचीही नोंद झाली. देशात ३ एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत एकू ७.४४ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. दरम्यान, देशातील सर्वाधिक केस या महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये नोंदवल्या देल्या आहेत. 

शनिवारी राज्यात कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद

राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात तब्बल ४९ हजार ४४७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारची आकडेवारी ही राज्याची चिंता वाढवणारी आहे. (Maharashtra reports 49,447 new coronavirus case and 277 deaths in the last 24 hours)

राज्यात शनिवारी ४९,४४७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर दुसरीकडे  ३७,८२१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात शनिवारपर्यंत एकूण ४०११७२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८४.४९% इतकं झालं आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 

Web Title: corona cases may cross 1 4 million mark by the end of may says iisc Bengaluru research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.