हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 11:45 AM2020-06-29T11:45:27+5:302020-06-29T11:46:54+5:30

सरकारने कोरोनाची भीती लोकांच्या मनातून घालविण्यासाठी बाजारपेठा सुरु केल्या आहेत. तरीही लोक सांभाळून घरातून बाहेर पडू लागले आहेत. काही जणांनी आता गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यमही शोधायला सुरुवात केली आहे.

Corona crisis decrease your income; can increase income golden way | हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

Next

कोरोनामुळे तीन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे अनेकांचे उत्पन्न बुडालेले आहे. कंपन्याही बंद असल्याने नोकरदार वर्गासह व्यापाऱ्यांचे उत्पन्न जवळपास बंदच होते. पुढील काही काळ अशीच परिस्थिती सुरु राहण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी लॉकडाऊन उठवित Unlock-1 सुरु केले आहे. कोरोनाचे रुग्ण कमालीचे वाढत असताना मृत्यूदर कमी असल्याने लोकांच्या मनातील भीतीही कमी झालेली आहे. मात्र, उत्पन्न सुरु व्हायला अद्याप वेळ लागणार आहे. अशा कोरोना काळामध्ये उत्पन्न मिळविण्यासाठी सोने हे मोठा पर्याय ठरणार आहे.


सरकारने कोरोनाची भीती लोकांच्या मनातून घालविण्यासाठी बाजारपेठा सुरु केल्या आहेत. तरीही लोक सांभाळून घरातून बाहेर पडू लागले आहेत. काही जणांनी आता गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यमही शोधायला सुरुवात केली आहे. कारण मुलांचे शिक्षण, लग्न, वृद्धापकाळासाठी बचत तर करायचीच आहे. शेअर बाजारातही तेवढी तेजी नाहीय. यामुळे सोन्याच्या किंमतींनी कधी नव्हे तेवढी उंची गाठली आहे. 


गुंतवणूकदारांसाठी सोने हेच एक सुरक्षित मानले जाते. बाजारात असलेली अनिश्चितता आणि भीतीचे वातावरण यासाठी योग्य असते. साधारण मार्च, एप्रिल मे मध्ये लग्नाचा हंगाम सुरु होते. यामुळे भारतात सोन्याला प्रचंड मागणी असते. मात्र, यंदा तसे काहीच घडलेले नाही. तरीही गेल्या 3 महिन्यांत भारतातच नाही तर जगभरात सोन्याला प्रचंड भाव आला आहे. 26 मार्च 2020 मध्ये 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 42,170 रुपये होती. हाच दर 26 जूनला 48,250 रुपये झाला. म्हणजेच दोन महिन्यांत सोन्याने 14.41 टक्के वाढ नोंदविली. एवढ्या काळासाठी जर एसबीआयमध्ये एफडी ठेवली असती तर तुम्हाला केवळ 3 टक्के व्याज मिळाले असते. 

गुंतवणुकीचे पर्याय
जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर दागिणे खरेदीपासून लांब रहावे. कारण सोन्याची शुद्धता, मेकिंग चार्ज आणि सुरक्षेसंबंधीची समस्या असते. यापासून वाचण्यासाठी डिजिटल इन्व्हेस्टमेंट ऑप्शनचा विचार करावा. गोल्ड म्यूच्युअल फंड्स, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आणि सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स (SGB) हे पर्याय आहेत. SGB हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये सोन्याची किंमत वाढण्याच्या फायद्याबरोबरच तुम्हाला एक निश्चित व्याजाचे उत्पन्नही मिळणार आहे. जे वर्षातून दोनदा वाढविले जाते. 

सरकारी योजना
केंद्र सरकारच्या छोट्या बचत योजनाही फाय़द्याच्या आहेत. या प्रमुख्याने पोस्टाच्या योजना असतात. या सुरक्षित असल्याने लोकप्रियही आहेत. पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम, एफडी, सुकन्या समृद्धी यावर चांगले व्याज मिळते. वरिष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याज दिले जाते. याचाही विचार करता येऊ शकेल. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

India China FaceOff: चीनच्या तंबूला अचानक आग लागली, अन् भारतीय जवान भडकले; व्ही के सिंहांचा गौप्यस्फोट

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित

CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

Web Title: Corona crisis decrease your income; can increase income golden way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.