दिलासा! कोरोना संकटात रोजगार बुडाला? ही सरकारी बँक देणार कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 06:35 PM2020-04-27T18:35:59+5:302020-04-27T18:37:42+5:30
कोरोनाच्या संकटकाळासाठी ही योजना बनविण्यात आल्याचे बँकेने सांगितले आहे. ज्यांचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले असेल त्यांनाच हे कर्ज मिळणार आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. उद्योगधंदे बंद असल्याने कंपन्या पगार कपातीबरोबरच कर्मचारी कपात करण्याच्या विचारात आहेत. अशावेळी घरखर्च कसा चालवायचा या विवंचनेने ग्रामीण भागातील अनेकांना ग्रासलेले आहे. या काळात रोजगार गेल्यास सार्वजनिक क्षेत्रातली इंडियन ओव्हरसीज बँक मदतीला धावून येणार आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेने एक खास कर्ज योजना सुरु केली असून स्वयं सहायता गटा (एसएचजी) साठी 9.4 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज मिळणार आहे. यासाठी कोणतीही अतिरिक्त सुरक्षा गॅरंटी घेण्यात येणार नाही. ही योजना ३० जून २०२० पर्यत असणार आहे.
कोरोनाच्या संकटकाळासाठी ही योजना बनविण्यात आल्याचे बँकेने सांगितले आहे. ज्यांचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले असेल त्यांनाच हे कर्ज मिळणार आहे. त्य़ाशिवाय कमीत कमी दोनवेळा या समुहांनी एखाद्या बँकेचे कर्ज घेतलेले असायला हवे. म्हणजेच वेळेवर परतफेड केलेल्यांनाच कर्ज मिळणार आहे.
यासाठी बँकेच्या शाखेमध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे. जर शाखा लांब असेल तर बँकेच्या प्रतिनिधीद्वारे अर्ज करता येणार आहे. एका गटाला जास्तितजास्त १ लाख रुयांचे कर्ज मिळणार आहे. तर त्याचबरोबर प्रत्येक सदस्याला ५ हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज सहा दिवसांत मंजूर केले जाणार आहे. कर्ज मिळाल्यानंतर पहिले सहा महिने हप्ते भरण्यापासून सूट मिळणार आहे. यानंतर सलग ३० महिन्यांमध्ये परतफेड करावी लागणार आहे. म्हणजेच ३६ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
अन्य बातम्या वाचा...
आज कुछ तुफानी करते है! विक्री थंडावलेली असूनही कंपनीने पगारवाढ केली
गुन्हा दाखल झाल्यानंतर कनिका कपूर वठणीवर; सरकारला दिली 'ऑफर'
CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन
यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन
एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले
CoronaVirus नफेखोरी! 245 ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना खरेदी; काँग्रेसने विचारला जाब