Corona Curfew In India: कोरोना रात्रीचाच बाहेर पडतो का? नाईट कर्फ्यूवर नरेंद्र मोदींनी समजावले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 10:33 PM2021-04-08T22:33:54+5:302021-04-08T22:51:30+5:30

PM Narendra Modi's Answer on Night Curfew trolling: महाराष्ट्र, पंजाब, लखनऊ, नोएडा, गाझियाबादसह अनेक शहरांत आणि काही राज्यांत रात्रीच्या संचारबंदीसारखे निर्बंध लादण्यात आले आहेत. याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींना उतरावे लागले आहे.

Corona Curfew In India: Does Corona go out at night? PM Narendra Modi's response to night curfew trolling | Corona Curfew In India: कोरोना रात्रीचाच बाहेर पडतो का? नाईट कर्फ्यूवर नरेंद्र मोदींनी समजावले...

Corona Curfew In India: कोरोना रात्रीचाच बाहेर पडतो का? नाईट कर्फ्यूवर नरेंद्र मोदींनी समजावले...

Next

देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण कमालीचे वाढू लागले आहेत. यामुळे राज्यांनी अनेक ठिकाणी रात्रीच्या कर्फ्यूची (Night Curfew) अंमलबजावणी केली आहे. यावरून देशभरातून नागरिकांनी ट्रोलिंग करण्यास सुरुवात केली असून कोरोना काय रात्रीचाच बाहेर पडतो का, असा सवाल विचारण्यास सुरुवात केली आहे. याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच (Narendra Modi) उत्तर दिले आहे. (Why night curfew implemented to stop Corona Virus; Narendra modi gave Answer to trollers.)


महाराष्ट्र, पंजाब, लखनऊ, नोएडा, गाझियाबादसह अनेक शहरांत आणि काही राज्यांत रात्रीच्या संचारबंदीसारखे निर्बंध लादण्यात आले आहेत. याच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींना उतरावे लागले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोदींनी काही मुद्दे मांडले आहेत. यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तरी चालेल परंतू कोरोना चाचण्या वाढवा असे आदेश दिले आहेत. सोबतच त्यांनी नाईट कर्फ्यूला कोरोना कर्फ्यूचे नाव दिल्याने लोकांमध्ये कोरोनाविषयी जागरुकता वाढेल आणि ते काळजी घेतली असे सांगितले. तसेच जगभराने नाईट कर्फ्यूचा स्वीकार केला आहे. आता आम्हाला नाईट कर्फ्यू जरी असला तरी त्याला कोरोना कर्फ्यू नावाने आठवणीत ठेवायला हवे असे सांगितले. 



काही बुध्दीवंत कोरोना रात्राचा येतो का, असे विचारत आहेत. जगाने हा कर्फ्यू स्वीकारला आहे. कारण प्रत्येकाला कर्फ्यू काळात विचार येतो की तो कोरोना काळात जगतोय. आपण रात्री 9 ते सकाळी 5 या काळात नाईट कर्फ्यू केल्यास चांगले होईल. यामुळे अन्य व्यवस्था प्रभावित होणार नाहीत. तसेच नाईट कर्फ्यूला कोरोना कर्फ्यू म्हणून लागू करावे, ते जास्त प्रभावी होईल, असे मोदी म्हणाले.


Corona Vaccination: देशात 11 ते 14 एप्रिल 'लसीकरण उत्सव'; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

देशात कोरोना रुग्ण वाढण्याचे नेमके कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या (CM Meeting with PM) बैठकीत सांगितले आहे. आपण कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) नादात कोरोना चाचण्यांकडे (Corona Testing) दुर्लक्ष केले आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाल्याचे मोदी म्हणाले. तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत 'लसीकरण उत्सव' साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. (11th to 14th April can be observed as 'Tika (vaccination) Utsav' for COVID19 vaccination: Prime Minister Narendra Modi)


कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, पण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्र्यांना आदेश

कोरोनाचे रुग्ण वाढल्याने एकीकडे राजकारण रंगलेले असताना मोदींनी मुख्यमंत्र्यांना हे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांनी कोरोना टेस्टिंगची व्याप्ती वाढवावी. 70 टक्के RT-PCR टेस्ट झाल्या पाहिजेत. देशातील, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, परंतू चाचण्या वाढवायला हव्यात. योग्य पद्धतीने स्वॅब घेणे खूप गरजेचे आहे, तसेच त्याची चाचणी होणेदेखील खूप महत्वाचे आहे, असे मोदी म्हणाले. 
 

Web Title: Corona Curfew In India: Does Corona go out at night? PM Narendra Modi's response to night curfew trolling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.